अवैधरित्या वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांसह एकाला वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले खरे ? पण वालचंदनगर पोलीस बिगर नबंर प्लेटचे वाहन आरटीओ कडे वर्ग करणार का ? नागरिकांत चर्चा ..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती इंदापूर रोडने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एकाला वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून,संशयित आरोपी शिवाजी मच्छिंद्र चव्हाण ( रा.शंभोनगर,सणसर,ता.इंदापूर, जि.पुणे ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३७९, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५,९ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ४,खान आणि खनिज अधिनियम १९५७ चे कलम ४,२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वालचंदनगर पोलीस शिपाई किसन सुरेश बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दिमध्ये पेट्रोलींग करीत असताना, शेळगाव एस टी स्टॅन्ड जवळून बारामती इंदापुर रोडने इंदापुरकडे एक पांढ-या रंगाचा हायवा ट्रक जाताना दिसला, त्याचा पाठलाग करुन थांबवले असता,माँडेल १६१८ चालवत असलेल्या शिवाजी चव्हाण याला ताब्यात घेत ट्रॅकची पाहणी केली असता,या हायवा मध्ये अवैधरित्या चोरून आणलेली साडे तीन ब्रास वाळु मिळुन आली.त्याच्याकडे कोणताही वाळु वाहतुकीचा परवाना मिळून आला नाही.या कारवाईत दहा लाखांचा एक पांढ-या रंगाचा टाटा हायवा मॉडेल १६१८ आरटीओ नंबर नसलेला व १८ हजारांची साडे तीन ब्रास वाळु बेकायदेशीर पणे बिगरपरवाना अवैध्यरीत्या वाळुची वाहतुक करताना मिळून आला असे फिर्यादीत म्हणटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *