Big Breaking : विश्रामबाग पोलिस विभागाचे सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांची पुण्याच्या गुन्हे शाखेत नियुक्ती ….


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

विश्रामबाग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.गुन्हे शाखेतील सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे हे आज (दि.३१ जानेवारी) सेवानिवृत्त झाले. गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त २ या पदावर नारायण शिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याबाबतचे आदेश सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने काढले आहेत.

सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांनी यापुर्वी पुणे ग्रामीणमधील बारामती तसेच बीड जिल्ह्यात आणि इतर काही ठिकाणी कर्तव्य बजाविले आहे.सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे हे आज सेवानिवृत्त झाले आहेत.सहाय्यक आयुक्त २ या पदावर नारायण शिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आले आहे.एसीपी नारायण शिरगावकर यांनी आतापर्यंत अनेक क्लिष्ट गुन्हयांचा तपास केला आहे. दरम्यान,अनेक गंभीर गुन्हयांची उकल देखील त्यांनी केली आहे. बीड येथे कार्यरत असताना त्यांनी सराईत गुन्हेगारांविरूध्द धडक मोहिम सुरू करून अनेकांना गजाआड केले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *