या पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्याची तक्रारदारांच्या कुटुंबियांची मागणी..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाइव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील एका गावातील महिला कौटुंबिक वाद झाल्यानंतर विष प्राशन केले होते.या घटनेचा तपास तक्रारीचा तपास पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला होता.या लिंगपिसाट अधिकाऱ्याने यातील तक्रारदार महिलेशी दिवसेंदिवस संपर्क वाढवून तिला प्रेमात पाडले.सदर महिला ही एमपीएससी चा करत असल्याची माहिती या लिंगपिसाट पोलीस अधिकाऱ्याला पडली होती.मी तुला एमपीएससी च्या अभ्यासक्रमासाठी पुण्यात ठेवतो.
तेथे लागेल ती मदत करतो अशी भुरळ घातली.आपली पत्नी शिकून एखादी अधिकारी होईल या आशेवर पतीने दोन मुली असताना सुद्धा तिला अभ्यासाठी परवानगी दिली.काही दिवसानंतर सदर महिलेने कुटुंबाशी संपर्क तोडायला सुरवात केली.नंतर १६ जानेवारी रोजी सदर महिलेच्या हातावर त्या अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटो तिच्या पतीला दिसून आला.यावर पती पत्नीचा वाद झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने चक्क फोन तिच्या नवऱ्याला तिला जाब विचारला तर तुझे हातपाय मोडीन अशी भाषा वापरली.याशिवाय दोन खासगी माणसं घरी पाठवून बंदुकीचा धाक दाखवून साहेबांच्या नादी लागू नको नायतर साहेब तुला संपवून टाकतील अशी धमकी दिली.
हे प्रकरण गंभीर होतं चालल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तक्रारदार याने ही गोष्ट भावंडांना सांगितले. संबंधित कुटुंबाने लागलीच पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी तातडीने अप्पर पोलीस अधिक्षक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान या प्रकरणामुळे संबंधित महिलेच्या पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून. त्यांना आता दोन लहान मुली आहेत.आता या मुलींना मी आई कोठून आणून देऊ.माझं कुटुंब उद्वस्त झालं आहे.आपल्या पदाचा गैरवापर करून माझं कुटुंब उद्वस्त केल आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यावर बदलीची जुजबी कारवाई न करता सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी होत आहे.