महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून,आता किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.तिथे स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.या राज्यसरकार च्या निर्णयाला विरोधी पक्षाकडून देखील मोठा विरोध होत आहे, अशातच आता या प्रकरणात बंडा तात्या कराडकर यांनी उडी घेतली असून,त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत सरकारवर टीका केली आहे.
यामध्ये बंडा तात्या म्हणतात,की,माझी शासनाला विनंती आहे की आपण भाजीमंडईत सुद्धा दारू उपलब्ध केली, तर त्याचाही फायदा होईल.सकाळी वृत्तपत्र वाटणाऱ्यां मार्फत दारूची पाऊच देण्याची व्यवस्था केली. घर न सोडता दारू मिळण्याची व्यवस्था लोकांसाठी होईल. शाळेतील मुलांना खिचडीऐवजी दारू दिली, तर ते भारताचे सुदृढ नागरिक बनतील. देशाच्या दृष्टीने हा चांगला निर्णय असेल.मी सरकारला अजून एक विनंती करेन की,मंदिरामध्येही दारू उपलब्ध करून दिली,तर भाविकांना देवदर्शनाबरोबर जाताना तीर्थही मिळेल. त्यामुळे त्याचंही कल्याण होईल.त्यामुळे या निर्णयाबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो.
महाराष्ट्रातील जनतेला माझी प्रार्थना आहे की, सरकारच्या या धाडसी निर्णयाचं जल्लोषात स्वागत करावं.तसेच महाराष्ट्राचे शहेनशहा शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांचंही अभिनंदन करतो असे म्हणत राज्य सरकार व पवारांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.तसेच शासनाच्या या निर्णयाचे लोकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले पाहिजे.फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच दारोदारी रांगोळ्यांचे सडे काढले जावेत आणि या परमेश्वर आत्म्याला प्रार्थना करून हे समाज घातकी सरकार लवकरात लवकर रसा तळाला जावो हिच मागणी केली पाहिजे,अशी टीका ह.भ.प.बंडा तात्या कराडकर यांनी राज्यसरकार वर केली आहे.