सामाजिक बातमी : कै. नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम..बारामतीतील चाळीस पत्रकार बांधवांना दिले दोन लाखांच्या विम्याचे कवच..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पत्रकार दिनानिमित्त बारामतीतील कै.नामदेवराव नालंदे प्रतिष्ठान व संपादक पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार बांधवांचा दोन लाख रुपयांचा आरोग्य विमा मोफत करण्यात आला.यामध्ये बारामती मधील ४२ पत्रकारांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.हा कार्यक्रम हॉटेल ग्लोबल एक्झिक्यूटिव्ह खंडोबानगर येथे संपन्न झाला.कोरोना काळात देखील पत्रकार न थांबता कार्य करत होते.

याची दखल घेत संघटनेच्या वतीने त्यांना संरक्षण मिळावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे संपादक सुरक्षा दलाचे अध्यक्ष योगेश नालंदे यांनी सांगितले.दरम्यान या कार्यक्रमास बारामती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन सचिन सातव,नगरसेवक जयसिंग देशमुख, बाळासाहेब चव्हाण पाटील व टाटा एआयजीचे सेल्स मॅनेजर वैभव सस्ते उपस्थित होते.या कार्यक्रमास झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट,पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सुध्दा भेट दिली.

या दरम्यान बोलताना सचिन सातव यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून कोरोना काळातील कामाची दखल घेत संघटनेच्या सर्व पत्रकार बांधवांच्या कुटुंबाचा विमा खर्च मी स्वतः उचलणार असल्याचे सातव यांनी सांगितले. यावेळी संपादक पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. व जयसिंग देशमुख यांच्या वतीने संघटनेच्या 30 पत्रकार बांधवांना हिवाळी जर्किंगचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तानाजी पाथरकर, चेतन शिंदे, मन्सूर शेख, नानासाहेब साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *