फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
फलटण तालुक्यातील खटकेवस्ती येथे एक व्यक्ती स्वतः च्या मालकीच्या खोलीत जुगार अड्डा चालवत असल्याबाबत माहिती मिळाली असती,फलटण पोलिसांनी तात्काळ जात या अड्डयावर छापा मारला असता,त्याठिकाणी नितीन नामदेव गावडे वय.३८ वर्षे (रा.खटकेवस्ती,ता. फलटण,जि.सातारा ) ताया शंकर निंबाळकर,वय.४० वर्षे ( रा.डोर्लेवाडी,ता.बारामती,जि. पुणे )शैलेश भिमराव सोनवणे वय.४८ वर्षे,( रा.बारामती ता.बारामती ) इरफान सादिक तांबोळी,वय.३२ वर्षे (रा.बारामती सटवाजी नगर ता.बारामती ) दत्तात्रय रामचंद्र पिंगळे वय.२८ वर्षे ( रा.घोलपवाडी,ता.इंदापुर जि.पुणे ) अशोक ऊर्फ मुस्सा मोतीराम वाघमोडे ( रा. खटकेवस्ती,ता.फलटण,जि.सातारा ) सिद्धार्थ संतोष घाडगे (रा.इंदापुर चौक, बारामती,जि.पुणे ) सुनिल गजानन खटके ( रा.खटकेवस्ती ता.फलटण,जि.सातारा राजेंद्र दिनकर घाडगे ( रा.खटकेवरती ता.फलटण,जि. सातारा ) धिरज ज्ञानदेव नलवडे ( रा.गवळीनगर,ता. फलटण,जि.सातारा ) व निरा आप्पा वाघमोडे (पुर्ण नाव माहित नाही.)( रा.खटकेवस्ती,ता.फलटण,जि. सातारा ) यांना ताब्यात घेत त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम १८८,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (य),महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० चे कलम ११, महाराष्ट्र जुगार अधिनियमचे कलम ४,५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फलटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या खटकेवस्ती येथे एक व्यक्ती बेकायदेशीरपणे जुगार क्लब चालवत,असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे अंकित बरड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारला असता, त्याठिकाणी १० ते १५ जण जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत मास्कचा वापर न करता मानवी जीवित धोक्यात येईल असे कृत्य करून कोविडचा संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य करून एकत्रित येत जुगार खेळताना आढळून आले.
यातील काही आरोपी पत्त्याची पाने जागीच सोडत व पैसे पळून गेला.या ठिकाणी ३६,९७० किमतीचे जुगाराचे साहित्य, मोबाईल व रोख रक्कम मिळून आली.या ठिकाणी जुगाराचा अड्डा चालवणारा अशोक उर्फ मुस्सा मोतीराम वाघमोडे व इतर चार जण पळून गेले असून, पोलीस त्यांचा शोध आहेत.ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे,पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस
उपनिरीक्षक धोंगडे,पोलीस हवालदार टिळेकर,कदम, चालक बडे,अवघडे यांनी केलेली आहे.