Big Breaking : ५ लाख मुद्दलेच्या बदल्यात सव्वा नऊ लाख देऊनही त्याच नाही भागलं…जीवे मारण्याची धमकी देत बारामतीत करून घेतली तब्बल १५ लाखांची नोटरी…अखेर ग्रामीण पोलीस ठाण्यात त्या सावकारांवर गुन्हा दाखल..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

फलटण तालुक्यात अवैध सावकारकीचा पाश आवळताना दिसून येत आहे.मात्र गेल्या आठवड्यापासून ग्रामीण पोलीस ठाण्यात अवैध सावकारीबाबत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर फलटण तालुक्यातील अवैध सावकारीची अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. अशातच बारामती तालुक्यातील खासगी सावकार राजेंद्र वसंतराव जगताप (रा.भिकोबानगर,ता.बारामती,जि.पुणे याला दणका दिला असून याप्रकरणी फिर्यादी दिलीप भीमराव भोसले,वय.४८ वर्षे (रा.होळ,ता.फलटण,जि . सातारा) यांनी फिर्याद दिली असून,या खासगी सावकारांवर भा.द.वि कलम ५०४, ५०६, सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४५ नुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी दिलीप भोसले यांनी बारामती तालुक्यातील भिकोबानगर,पणदरे येथील खासगी सावकार राजेंद्र जगताप याच्याकडून सन नोव्हेंबर २०१५ मध्ये दरमहा ७ टक्के व्याजदराने पाच लाख रुपये फिर्यादींच्या घरी होळ,ता.फलटण या ठिकाणांहून घेतले होते.या बदल्यात तारण म्हणून भोसले यांनी काही जमीन मुदत खरेदी करून दिली होती. तसेच त्याच्या मोबदल्यात फिर्यादी भोसले यांनी डिसेंबर २०१५ पासून ते २०१७ पर्यंत वेळोवेळी एकूण आठ लाख पंचाहत्तर रुपये व त्यानंतर सन डिसेंबर २०२१ मध्ये पन्नास हजार मुदतीच्या बदल्यात ९ लाख पंचवीस हजार रोख स्वरूपात दिले असताना,देखील जानेवारी २०२२ मध्ये व्याजाचे आणखी तब्बल १० लाखांची मागणी करू लागला.

व ते न दिल्यास मुदत खरेदी म्हणून दिलेल्या जमिनीचा दस्त माझ्या नावावर करून दे अस म्हणत वारंवार फिर्यादीला धमकी देत असे.वेळोवेळी व्याजाच्या पैश्यासाठी जीवे मारण्याची धमकी देखील देत असत, तसेच फिर्यादीस बारामती येथे दमदाटीने घेऊन जात बेकायदेशीरपणे तब्बल १५ लाखांची नोटरी करून घेतलेली आहे.संशतीय आरोपी राजेंद्र जगताप हा खुनशी असून,तो गुंड लोकांना घेऊन फिरत असतो,त्या भीतीपोटी मी आतापर्यंत तक्रार दिली नाही,असे फिर्यादीत म्हटंले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास फळटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही.अरगडे करीत आहेत.

बातमी चौकट :

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेल्या दोन दिवसांपासून अवैध सावकारांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत.तरी फलटण ग्रामीण हद्दीतील नागरिकांनी अवैध सावकारी बाबत कोणावरही अन्याय झाला असल्यास संबंधितांनी कोणतीही भीती न बाळगता त्वरित फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचा मोबाईल क्र.९४२३०१२३४५ पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे मोबाईल क्रमांक. ७०३८२५०७०७ यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

धन्यकुमार गोडसे ( फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *