Breaking News : राज्यातील किराणा दुकानात,सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी होणार उपलब्ध ; राज्य सरकारचा मोठा निर्णय..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्य सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला असून, आता किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे.त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला असून,राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबधीची माहिती दिली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे.

शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.सध्या राज्यात वाईनची दरवर्षी ७० लाख लिटरची विक्री होते.सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर १० रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे.दुसरीकडे,अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो.

बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते.त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो.त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे. गोव्यात आणि हिमाचलात भाजपने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपने वाइन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र विरोध करत आहेत,असा टोला त्यांनी लगावला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *