Crime News : यवत पोलिसांनी कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत दोघांना घेतले ताब्यात..!!


यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

गोरक्षक संतोश विजय कबाडी वय,४३ वर्षे, ( रा.संत तुकाराम नगर, श्रीकृष्ण मंदिराजवळ,पिंदे बिल्डींग भोसरी पुणे ) बोरी दापोडी रोडने दौंड बाजुकडे जात असताना दापोडी गावच्या हददीत बोरी दापोडी रोडच्या कडेला रेल्वे फाटका जवळून जात असताना, संशतीय आरोपी गंगाराम चंदर पवार,वय.३७ वर्षे (रा.बोरीपार्धी ता.दौंड,जि.पुणे ) तसेच वाहन चालक रमेश आण्णा शिंदे,वय.३२ वर्षे ( रा.दापोडी,ता.दौंड,जि. पुणे ) हे टेम्पोमधून गायांची वाहतूक करताना मिळून आल्याने यवत पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर महाराष्ट्र टू प्राणी संरक्षण ( सुधारणा ) अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब),९ नुसार यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी गोरक्षक संतोष कबाडी हे त्यांचे साथीदार संतोष शिवरकर, विशाल दामोदरे,गणेश हुलावळे, ज्ञानेश्वर वाळके यांच्यासह दापोडी रोडने दौंड बाजूला जात असताना,बोरी दापोडी गावच्या रेल्वे फाटकाजवळून जात असताना,टेम्पो क्र.MH.42AQ 4470 हे पहिले असता थांबवून त्याची पाहणी केली असता,त्या वाहनात तीन जरशी गायी व एक जरशी कालवड मिळून आल्याने,याबाबत चालकाला विचारणा केली असता,ही जनावरे दौंड येथील कत्तलखाना येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.याबाबत तात्काळ यवत पोलिसांना संपर्क करत गाडी त्यांच्या ताब्यात देण्यात आली.यामध्ये १०,००० किंमतीच्या तीन जरश्या गायी व ७००० किंमतीची एक कालवड मिळून आली. व पांढऱ्या रंगाचा २,००,००० किंमतीचा टेम्पो असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास यवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जाधव करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *