एन.डी.एम.जे या संघटनेच्या आंदोलनास अखेर यश.. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व सहा.आयुक्त यांना तात्काळ कार्यवाहीचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांचे आदेश..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना बौद्ध, मातंग,चर्मकार यांच्यासह अनुसूचित जाती-जमातींच्यावरील अन्याय अत्याचारात वाढ होत आहे. एट्रोसिटी ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी,जातीय अत्याचारात खून झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन,विशेष सरकारी वकील नियुक्ती,मिनी ट्रॅक्टरच्या योजनेस निधी,भूमिहिनांना जमिनी अशा एकूण ३२ मागण्यांवर कार्यवाही तसेच १२ मागण्या शासनास पाठवून आणि २० मागण्यांबाबत क्षेत्रीय अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांची आयुक्त समाजकल्याण पुणे यांचे अंतर्गत ऑनलाईन बैठक आयोजित करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन उपायुक्त समाजकल्याण यांनी दिले.

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेच्या वतीने ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य संघटक पंचशीला कुंभारकर,जेष्ठ समाजसेविका महानंदाताई डाळिंबे,पश्चिम महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक दादासाहेब जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *