Crime News : इंदापूर पोलिसांनी जनावरांचे मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडत,साडे पाच लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क….

इंदापूर पोलीस शहरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना,डोंगराई सर्कल येथे जुना सोलापूर पुणे रोडवर चारचाकी महिंद्रा पिक अप जनावरांची अवैधरित्या कत्तल करून तब्बल ५०० किलो मांसाचा साठा करून वाहतुक करणाऱ्या आरोपी साबीर अकील शेख,वय.२१ वर्षे ( रा.NIBM रोड,उंद्री गल्ली नंबर.१,पुणे ) याला ताब्यात घेत,त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप व ५०० किलो मांस असा तब्बल साडे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी आरोपीवर भा.द.वि कलम ४२९,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सुधारित १९९५ कलम ५ (क),९ (अ),पशू क्रूरता अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, इंदापूर शहरात पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना, डोंगराई सर्कल येथे जुना सोलापूर पुणे हायवे रोडवर एक चारचाकी महिंद्रा पिक अप गाडी क्र. MH.23 AJ 2285 ही संशयितरित्या आढळुन आल्याने, गाडी थांबवत चौकशी केली असता,त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली असता वाहनाची तपासणी केली असता,वाहनात जनावरांची अवैधरित्या कत्तल करून ताडपत्री खाली हातरुन अंदाजे ५०० किलो मांसाचा साठा करून झाकून ठेवलेली दिसून आली. त्याच्याकडे कत्तलखाना चालविण्याचा परवण्याबाबत चौकशी केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.त्याच्या ताब्यातील ५ लाखांचे महिंद्रा पिक अप व ५००, किलो पन्नास हजारांचे गोमांस असा एकूण ५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोनवरून माहिती देत,पुढील कारवाईसाठी तजवीज ठेवली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *