इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
नवीन मेडिकल सुरू करण्यासाठी हुंड्याच्या रक्कमेची मागणी करत,विवाहितेचा मानसिक छळ करत व वारंवार अपमानास्पद वागणुक देत नांदवण्यास नकार दिल्या प्रकरणी नवऱ्यासह सासरच्या पाच जणांवर भा.द.वि कलम हुंदबंदी अधिनियम १९६१ चे कलम ३,४,भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३२३ ४९८,५०४ ५०६ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी २४ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार संशयित आरोपी पती केदार गजेंद्र शिंदे,सासरे गजेंद्र भगवान शिंदे,सासू प्राणीला गजेंद्र शिंदे ( सर्व रा.मनीषानगर,ता. पंढरपूर ) नणंद प्रिया पंकज शेगोकर ( रा.मुंबई ) नणंद तृप्ती अभिजित सोमवंशी ( रा.पिंपरी चिंचवड,पुणे ) यांच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,१६ फेब्रुवारी २०२१ लग्न झाल्यापासून हा प्रकार सुरू होता.पीडित महिलेच्या लग्नात देखील नणंद तृप्ती सोमवंशी हिने अडवणूक करून,ऐन लग्नाच्या वेळी दोन लाख हुंडा म्हणून घेतले.लग्न झाल्यानंतर देखील लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पती व सासू सासऱ्या यांच्याकडून माझ्या वडिलांनी लग्नात आम्ही सांगितल्याप्रमाणे कोणत्याही वस्तू दिल्या नाहीत,त्या मागवून घे असे म्हणत पीडित महिलेला शिवीगाळ करून मला घालून पाडून बोलण्यास सुरुवात केली.एवढं होऊन सुद्धा लग्नाच्या सोळाव्या दिवशी वडिलांनी चाळीस हजारांची भांडी दिली,एवढं देऊन सुद्धा तुला नीट स्वयंपाक करता येत नाही,आम्हाला नवा मेडिकल व्यवसाय सुरू करायचा आहे,तुझ्या आई वडिलांकडून वीस लाख मागवून घे,यासाठी पती केदार रात्री अपरात्री दारू पिऊन येत,लाथा बुक्क्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.याप्रकरणी इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.