Big Breaking : गुटखा वाहतूक प्रकरणी लोणी काळभोर पोलीस पोलिसांची कारवाई ; गुटख्यासह ८१ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!


लोणी काळभोर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

लोणी काळभोर हद्दीतून थेऊर फाटा चौक,पूणे-सोलापूर रोड, पुणे वरून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक क्र.एम. एच.११ सी एच ६०६८ ताब्यात घेत,त्यातील ५६ लाखांचा ४८ हजारांचा ४००० किलो विमल गुटखा व आयशर ट्रक २४ लाख ५० हजारांचा असा ८१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चालक प्रवीण दुर्योधन जाधव,वय.२६ वर्षे ( रा.गुरसाळे,ता.खटाव,जि. सातारा ) याच्यावर भा.द.वि कलम १८८,२७२,२७३,३२८,३४ व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३० (२),(अ),२६ (२),(i),२६ (२) (lV),अन्न सुरक्षा मानके कायदा प्रॉव्हिबिशन अँड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २,३,४ तसेच सहवाचन ३ (१),zz चे उल्लंघन केल्याने नियम ५९ अनव्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या आधीक माहितीनुसार,पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट-६, अधिकारी व अंमलदार युनिट ६ च्या हद्दीमध्ये गस्त करताना,त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणी काळभोर हद्दीमधून सोलापूर रोड वरून एका आयशर ट्रकमध्ये अवैध गुटखा घेवून जात असल्याची बातमी मिळाली असता,युनिट ६ यांनी सापळा रचन थेऊर फाटा चौक,पुणे येथे आयशर ट्रक क्र.एमएच ११ सी एच ६०६८ हा ताब्यात घेत चौकशी केली असता,त्याने ट्रकमध्ये गुटखा असल्याचे सांगितले.त्याच्यावर कारवाई करता,अन्न व औषध प्रशासन औंध,यांना संपर्क साधत,त्यांच्या समोर ट्रकची तपासणी केली असता,त्यामध्ये गुटख्याच्या १५० गोण्या मिळून आल्या.त्यामध्ये ५६ लाख ४८ हजारांचा ४००० किलो विमल गुटखा व वाहतूकीकरिता वापरलेला २४ लाख ५० हजारांचा आयशर ट्रक असा ८१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.हा माल बाजारामध्ये दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे निदर्शनास आले असून बाजार भावाने जप्त गुटखा मालाची किंमत करोडोमध्ये जात आहे.

ही कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपआयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक,नरेंद्र पाटील,पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले,पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके,विठ्ठल खेडकर,रमेश मेमाणे,कानिफनाथ कारखेले,नितीन शिंदे,नितीन मुंढे,बाळासो सकटे,प्रतिक लाहिगुडे,ऋषीकेश ताकवणे,ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार,ऋषिकेश टिळेकर,शेखर काटे,नितीन धाडगे,सुहास
तांबेकर व ज्योती काळे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *