सामाजिक बातमी : जवान अन किसान देशाचे आधारस्तंभ, त्यांचा आदर करणे आपली सामाजिक जबाबदारी : छगन भुजबळ


महाराष्ट्र टुडे लाइव्ह न्यूज नेटवर्क…

येवला येथे वीरचक्र पुरस्करार्थी कचरू साळवे यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन आज पार पडले.सैनिक जसे देशाचे रक्षण करतात,तसेच समाजानेही सैनिकांचा आदर,सन्मान करायला हवा,त्यांची काळजी घ्यायला हवी.तसेच शेतकरी हा अन्नदाता असतो,त्याच्या कष्टकरी हातांनाही बळ दिले पाहिजे. वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचा लढा प्रेरणादायी आहे.म्हणूनच आज एका जवानाला हक्काचे घर देताना, त्या घराचा पाया रचण्याचा बहुमान हा एका शेतकरी जोडप्याला देऊन “जय जवान जय किसान” एकप्रकारे या दोघांचा गौरव केला.ज्या सैनिकांच्या भरवशावर आपण सुखाची झोप घेतो त्या प्रत्येक सैनिकांची आपण काळजी घेतली पाहिजे.

तसेच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने आजच्या शुभ दिवशी वीरचक्र पुरस्करार्थी कचरू साळवे यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले आहे,ही खूप आनंदाची बाब आहे.पुढील वर्षी ह्याच दिवशी गृहप्रवेश करण्यात यावा.वीरचक्र पुरस्कारार्थी कचरू साळवे यांच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या जागेवर घर बांधून देण्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेना पक्षाच्या वतीने घेण्यात आली असून बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षाने साळवे कुटुंबियांना दिलेली ही भेट अतिशय मोलाची असून सैनिकांच्या कुटुंबाबाबत शिवसेनेने घेतलेला हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे.

वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे सन १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेऊन स्वतःच्या जीवावर उदार होऊन सहकारी सैनिकांचे प्राण वाचविले होते.देशासाठीचे त्यांचे हे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन शासनामार्फत त्यांना दोन हजार फुटाची जागा निवास बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.पुढील वर्षी २३ जानेवारीलाच साळवे यांचे कुटुंब नवीन घरात प्रवेश करेल,असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *