Crime News : घरफोड्या,विहरीवरीलइलेक्ट्रॉनिक मोटार चोरी करणाऱ्या टोळीला भिगवण पोलिसांनी जेरबंद करत दीड लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल,घरफोडी विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारची चोरी करणाऱ्या अट्टल टोळीला भिगवण पोलिसांनी जेरबंद केले आहे.याप्रकरणी पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी भैय्या सदाशिव काळे,कर्मा दासा भोसले,( दोघे रा.डाळज,नंबर १ ता.इंदापुर ) तसेच पाण्याची मोटार चोरणारे राजेश जगदीश यादव,व इस्त्राईल रहमतउल्ला खान,( दोघे रा.मदनवाडी,ता. इंदापुर) अशा चौघांना ताब्यात घेत,त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, डाळज नं.१ गावच्या हददीतील कृष्णा स्टोन कशर येथील शेडच्या दरवाज्याची कडी काढून तसेच डाळज नं.२ गावच्या हददीतील समीर अन्सारी यांच्या राहत्या घरामध्ये व भादलवाडी गावच्या हददीत बिल्ट कंपनीचे सिक्युरीटी गार्डच्या रूममधुन अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम,मोबाईल असा १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच मदनवाडी गावच्या हददीतील ओढयाचे जवळील विहीरी वरील इलेक्ट्रीक मोटार चोरट्याने चोरून नेल्याबाबतची फिर्याद भिगवण पोलीस ठाण्यात दिली होती.या गुन्ह्यांचा तपास करीत असताना एका गोपनीय बातमीदांरामार्फत माहिती मिळाली की,भैय्या काळे व कर्मा
भोसले यांनी गुन्हे केले आहेत. त्यानुसार त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली.तसेच पाण्याची इलेक्ट्रीक मोटार चोरणाऱ्या राजेश यादव,इस्त्राईल खान,यांना ताब्यात घेत त्यांचेकडे चौकशी केली असता,त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांना या गुन्हयात अटक करून त्यांच्या ताब्यातील २० हजारांची विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार हस्तगत केली आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे,यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील,सुभाष रूपनवर,रुपेश कदम,पोलीस अंमलदार रामदास जाधव,विजय खाडे,समीर करे,सचिन पवार,महेश उगले,अंकुश माने,हसीम मुलाणी,दिपक वेताळ,पोलीस मित्र अतुल माने यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *