यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे सोलापूर हायवेलगत यवत येथे असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन गॅस कटरने कापून तब्बल तेवीस लाख ऐंशी हजारांची अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत यवत पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३८०, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल असून, याप्रकरणी संशयित आरोपी अजय रमेशराव शेंडे,वय.३२ वर्षे ( रा.सहजपूर,ता.दौंड,जि.पुणे )यांनी आपल्या साथीदार शिवाजी उत्तम गरड,वय.२५ वर्षे, ( रा. करंजी,ता. रिसोड,जि.वाशीम ) ऋषीकेश काकासो किरतके,वय. २२ वर्षे , ( रा.देवधानुरा,ता.कळंब,जि.उस्मानाबाद ) व त्याचे इतर दोन फरार साथीदार यांनी केला असून,आरोपींना अटक करण्यात आली असून,चौकशी दरम्यान त्यांनी केलेले कुरकुंभ येथील स्टेट बँकेचे एटीएम चोरीबाबत,वाशीम येथील घरफोडीचा गुन्हा तसेच गातेगाव येथील एटीएम फोडत चोरीबाबतचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार,पुणे – सोलापूर महामार्गावरील यवत येथे असणाऱ्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडत तेवीस लाखांची चोरी झाल्याची घटना घडली होती,त्या अनुषंगाने तपास करीत असताना,पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,यवत येथील चोरीचा गुन्हा अजय शेंडे याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली असता सहजपुर येथील शेंडे याला ताब्यात घेत,चौकशी केली असता,शिवाजी गरड व ऋषीकेश किरतिके यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील तब्बल दहा लाखांची रोकड व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.यामध्ये आरोपींना खाक्या दाखवताच त्यांनी केलेल्या गुन्ह्यापैकी कुरकुंभ येथील स्टेट बँकेचे एटीएम चोरी करण्याचा गुन्हा,वाशीम येथील घरफोडी करून तब्बल १२ तोळे सोने व लॅपटॉप चोरी केल्याचा गुन्हा,गातेगाव येथील एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्यने तोडत चोरी केल्याचा गुन्हा तसेच यवत व कुरकुंभ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.तपासामध्ये आरोपींनी युट्युब वरून घरफोडी,एटीएम चोरी करण्याचा प्लॅन करत त्यानुसार माहिती गोळा करत त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागवून घेतले तसेच या टोळीवर चोरीचे तीन गुन्हे दाखल असून,या टोळीवर इतर गुन्हे असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,रामेश्वर धोंगडे,यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे,स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.फौजदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार राजू मोमीन,अजित भुजबळ,असिफ शेख,अजय घुले,प्रमोद नवले, विजय कांचन,चंद्रकांत जाधव,पोलीस नाईक योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे,अमोल शेंडगे,बाळासाहेब खडके,प्रसन्ना घाडगे, सहा.फो. मुकुंद कदम,महिला पोलीस शिपाई पूनम गुंड,यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गुरू गायकवाड,निलेश कदम,मारुती बाराथे,रामदास जगताप,महेंद्र चांदणे यांनी केलेली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत.