Breaking News : गर्भवती वनरंक्षक महिलेस मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला पोलिसांनी घेतले ताब्यात..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मला न विचारता वन मजूर प्राण्यांच्या जनगननेसाठी का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी ही मारहाण केली आहे.मारहाण करणाऱ्या सरपंचा विरोधात सातारा तालुका पोलिसांत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात असून,संशयित आरोपी रामचंद्र जानकर याच्यावर भा.द.वि कलम ३५३,३३२, ५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोध मोहिमेसाठी पथके रवाना केली होती.या मारहाणीच्या घटनेने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.सातारा पोलीसांनी आरोपीस मध्यरात्री ३ वाजता शिरवळ येथून अटक केली असल्याची माहिती सातारा अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली.

सातारा तालुक्यातील पळसवडे गावच्या माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.वनविभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या घडलेल्या प्रकाराची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती स्वतःया पिडीत कर्मचाऱ्यांनी दिली आहे. पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.या घटनेचे पडसाद संपुर्ण राज्यभर उमटले असुन घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *