दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड तालुक्यातील कानगाव येथे वीज महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास शिंदे यांच्यास पाच जणांवर यवत पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमविणे, शिवीगाळ, मारहाण व सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. दरम्यान,मागील काही दिवसांपासून महावितरण वीज कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात थकीत कृषी पंपाचे विज बिल भरण्यावरून वाद सुरू आहेत.दौंडच्या पुर्व भागात काही दिवसांपूर्वी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज जोडणी तोंडुन साहित्य जप्त केले होते. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी दौंड पोलीस ठाण्यात तीव्र आंदोलन छेडले होते.
हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी (दि.१७ ) कानगाव येथे शेतीपंपाचे विजबिल थकल्याच्या कारणावरुन वीजजोड तोडण्यासाठी गेलेल्या महावितरण वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांकडून मारहाणीचा घटना घडली.या प्रकरणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास शिंदे, आबा उर्फ संतोष फडके,गोटु खळदकर,माऊली शेळके,चौधरी डायरेक्टर (पुर्ण नाव समजु शकले नाही ) यांच्यासह इतर अनोळखी असे व्यक्तींवर यवत पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कानगाव येथील शेतकरी यांनी यावेळी सांगितले की,आम्ही महावितरण च्या कर्मचाऱ्याना मारहाण केलेली नसून,कट केलेली विद्युत तार परत जोडून देण्यात यावी अशी विनंती केली होती.परंतु जाणून-बुजुन हे कट कारस्थान रचले जात आहे.राज्यव्यापी आंदोलन करण्याचा ईशारा ही यावेळी देण्यात आला.