इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर हद्दीत बारामती बायपास येथे अचानक नाकाबंदी सुरू असताना नाकाबंदी दरम्यान एकूण चार पिकअप वाहनांमध्ये तब्बल एकतीस जनावरे निर्दयीपणे कोंडून व चारा पाण्याची सोय न करता कत्तलीसाठी वाहतूक करताना मिळुन आली. याप्रकरणी आरोपी सागर शांताराम पुरकर,वय.३५ वर्षे ( रा. निमगाव,वाकडा,ता.निफाड,जि.नाशिक ) व संदिप गंगाधर पानगव्हाणे,वय.४५ वर्षे ( रा.निमगाव,वाकडा,ता.निफाड,जि. नाशिक ) या दोघांना ताब्यात घेतले असून बावडा रोडवर शहेबाज आयुब कुरेशी,वय.२५ वर्षे ( रा.कुरेशी गल्ली,ता.इंदापूर, जि.पुणे )याला ताब्यात घेत व पळून गेलेल्या अज्ञात इसमावर इंदापूर पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) (g),महाराष्ट्र टू प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ),(ब) ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,२१ जनावरांसह ३४ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, इंदापूर हद्दीत बारामती बायपासवर अचानक नाकाबंदी सुरू असताना नाकाबंदी दरम्यान संशयित अशोक लेलंड गाडी क्र. MH-45AF 2530 व गाडी क्र. MH-15AF 1171 गाड्यांना थाबवत पाहणी केली असता, MH-45AF 2530 मध्ये ६ देशी जातीची खोंडे व वाहन क्र. MH-15AF 1171 मध्ये ०६ देशी जातीची खोंडे अशी एकूण १२ लहान देशी जातीची खोंडे दाटीवाटीने बांधून वाहतुक करताना मिळून आली,यामधील एक चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील गाडीसह तब्बल १७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई होत असताना इंदापूर पोलिसांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार,बावडा रोडने इंदापूर बाजूकडे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारी दोन संशयित वाहने जात असल्याची माहिती मिळाली असता,बावडा- इंदापूर रोडवर जाऊन नाकाबंदी करत संशयित गाडी क्र.MH-42 AQ 3618 व गाडी क्र.MH-11 AG 4535 ह्या गाड्यांना बाजूला घेत पाहणी केली असता,MH- 42 AQ 3618 च्या चालकाने गाडी जाग्यावर सोडून पळ काढला.या वाहनांमध्ये जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने बांधून वाहतूक करताना मिळून आली.यातील MH-42 AQ3638 मध्ये ३ जर्सी जातीच्या खिल्लार गायी व MH-15 AG 4535 वाहनांमध्ये ४ मोठ्या देशी जातीच्या खिल्लार गायी व दोन देशी गायीची लहान वासरे अशी एकूण नऊ जनावरे मिळून आली त्यांना ताब्यात घेत तब्बल १५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमध्ये चार पिकअप वाहनांसह २१ जनावरे असा एकूण ३४ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे,महेश माने,पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे,सहाय्यक फौजदार काझी, पोलीस नाईक अमोल गायकवाड, पोलीस हवालदार रोहित यादव व होमगार्ड पोटफोडे यांनी केलेली आहे.