दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी कदम (रा.कदमवस्ती,आलेगाव, ता.दौंड,जि.पुणे )याच्याविरूध्द एका पस्तीस वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी भा.द.वि कलम ३२३,५०४ अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ कलम ३ (१) नुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून गेल्या ९ वर्षापासुन ही महिला राजेंद्र कदम यांच्यात घरकाम व शेतीचे काम करत असून,ही महिला कामानिमित्त दौंड येथे जाण्यासाठी निघाली असता, कदम यांनी दौंडला जाण्यासाठी महिलेला विरोध केला.मात्र मी माझ्या आईकडे जाऊन परत उद्या येते असा आग्रह धरल्यानंतर राजेंद्र कदम यांनी महिलेला चिडुन दोन मुसकाडीत मारल्या व गोठ्या जवळ पडलेला रबरी पाईप हातात घेवुन पायाच्या पोटरीवर व पाठीत मारहाण करत शिवीगाळ केली.व जातिवाचक शिवीगाळ केली असल्याचा आरोप देखील महिलेने केला आहे.याबाबत अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.
बातमी चौकट :
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतून बाजूला ठेवण्यासाठी राजकीय कट रचला आहे.
राजेंद्र कदम ( पुणे जिल्हाध्यक्ष प्रमुख स्वाभिमानी शेतकरी संघटना )