Breaking News : झारगडवाडीचे सुपुत्र सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.ज्ञानेश माने यांचे अपघाती निधन..!!


झारगडवाडी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ. ज्ञानेश लालासो माने ( वय.५४ ) यांचा काल यवत (दौंड) हद्दीत अपघात झाला होता त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान आज शुक्रवारी ( ता.१४ ) त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, दोन भावजया, पुतण्या असा परिवार आहे.

अभिनेते डॉ. ज्ञानेश माने यांनी अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना देखील न खचत आणि सतत प्रयत्नवादी राहून अनेक मराठी चित्रपटात, मालिकेत, नाटकांमध्ये काम केले आहे. यामध्ये मराठी चित्रपट “यदया”, “पळशीची पीटी”, “काळूबाईच्या नावाने चांगभलं”, “हंबरडा”, काही दिवसांत रिलीज होणारा “आंबूज” तसेच झी मराठी वर गाजलेली मालिका “लागीरं झालं जी” अश्या अनेक चित्रपटात, मालिकेत आणि नाटका प्रमुख भूमिकेत काम केले आहे. त्याच्या अपघाती निधनाने झारगडवाडी गावांवर शोककळा पसरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *