Big Breaking : गोपीचंद पडळकरांनी बळजबरीने पद देत, खोडसाळपणे फोटो व्हायरल करणाऱ्या नेत्याचा आठ दिवसांतच राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही,असे असताना गेल्या आठवड्यात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करून तेथे पद घेतलेला नेता चक्क एका आठवड्यात पुन्हा राष्ट्रवादीत गेल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडला असून,या नेत्याने भाजपचे आमदार पडळकर यांनी मला बळजबरीने पक्षाचे पद दिल्याचा दावा करत,पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला अक्षय खताळ असे या नेत्याचे नाव आहे.यावेळी अक्षय खताळ म्हणाले,राष्ट्रवादीतच प्रवेश निश्‍चित होता,मात्र काही जणांनी गोपीचंद पडळकर यांची भेट घालून देत,मी त्यांना भेटलो.भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडे मला काही जण घेऊन गेले,तिथे मला बळजबरीने पक्षाचे पद दिले व खोडसाळपणे ते फोटो व्हायरल केले.

राजन पाटील यांच्या आशीर्वादासाठीच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार माने, जिल्हाध्यक्ष साठे,माजी उपमहापौर कोल्हे यांनी मनोगत व्यक्‍त केले.अक्षय खताळ यांची भाजपा ओबीसी युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला होता.यावेळी राजन पाटील यांच्यासह मोहोळचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,माजी महापौर महेश कोठे,माजी उपमहापौर दिलीप कोल्हे,शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील,पंचायत समिती सदस्य अजिंक्‍यराणा पाटील,तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे,मोहोळ बाजार समितीचे उपसभापती दत्ता पवार आदी नेते मंडळी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *