Breaking News : झारगडवाडीतील सरपंच निवडीच्या दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायत ऑफिस मध्ये महिला सरपंच, उपसरपंचाचे पतीराज ठाणं मांडून..


शासनाच्या २०२१ च्या निर्णयानुसार पतीराजांवर थेट कारवाई होणार का ?..

झारगडवाडी : महाराष्ट्र टुडे लाइव्ह न्युज नेटवर्क…

महाराष्ट्रातील अनेक गावांत पत्नी सरपंच असली तर पती तिच्या कामात लुडबूड करीत असल्याचे चित्र अनेकवेळा समोर आले आहे.असाच प्रत्यय बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायत कार्यालयात समोर आला आहे.या गावात पाच वर्षात पाच, सहा सरपंच होणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी ( ता.११ ) कालावधी संपल्यामुळे दुसऱ्या सरपंचाची निवड करण्यात आली. यात महिला सरपंचांना खुर्चीचा मान मिळाला मात्र निवडीच्या दुसऱ्याच दिवशी महिला सरपंच, उपसरपंचाचे पतीराज ग्रामपंचायत कार्यालयात क्लार्क च्या समोर पायांची तीडी टाकत रुबाब दाखवत असल्याचे पहायला मिळाले, यामुळे निवड झालेल्या महिला गावचा कारभार पाहण्यासाठी सक्षम असुन देखील त्याचे पतीराज कार्यालयात ठाणं मांडून आहेत.

सरपंच गावचा प्रथम नागरिक असल्याने त्याचा वेगळाच तोरा असतो. महिला सरपंच सक्षम असतानाही, अनेक पतीराज किंवा नातेवाईक कामात हस्तक्षेप करीत कारभार पाहतात. राजकारणात महिलांनी पुढे येऊन गावचा कारभार करावा त्यामुळे शासनाने सरपंचाच्या पती व नातेवाइकाला कार्यालयातच येण्यास २०२१ मध्ये बंदीचा तसेच कामात हस्तक्षेप आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून तसा शासन जी आर ग्रामविकास मंत्रालयाने काढला आहे.यामुळे पतीराज आणि महिला सरपंच, उपसरपंच यांच्यावर कारवाई होणार का ?. सरपंच सक्षम असतानाही, अनेक पतीराज किंवा नातेवाईक ग्रामपंचायत मध्ये आपला तोरा दाखवतात.

अनेक महिला सरपंचांमध्ये नेतृत्वगुण असूनही त्या महिला सरपंचांना केवळ समाजाचा आणि पतीचा मान राखण्यासाठी नाइलाजास्तव ‘सहीबाई’ म्हणून काम करावे लागते. महिलांनी सक्षमपणे ग्रामपंचायत मध्ये काम करावे. शासनाने सरपंचाच्या पती किंवा नातेवाईकांना ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास मज्जाव केला आहे तरी पतीराज आपला तोरा दाखवण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये ठाणं मांडून बसत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *