Breaking News : बैलगाडा शर्यत पडली महागात, वाघळवाडीत १५ जणांविरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.!!


सोमेश्वर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील वाघळवाडी येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आल्यानंतर या प्रकरणी एकूण १० ते १५ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात भा.द.वी कलम १८८,२६९,२७० नुसार आरोपी अजय तात्याबा सावंत,जालिंदर शंकर अनपट, शुभम उर्फ बाबू जाधव ( पूर्ण नाव माहीत नाही ) रुत्विक उर्फ बापू सावंत ( पूर्ण नाव माहीत नाही ) महादेव सकुंडे ( पूर्ण नाव माहीत नाही ) विकी सावंत ( पूर्ण नाव माहीत नाही ) सुहास गोरख जाधव,प्रणव उर्फ मोन्या बापूराव सावंत,सवाणे ( पूर्ण नाव माहीत नाही ) सर्वजण रा.वाघळवाडी,ता.बारामती,जि.
पुणे,जगताप ( पूर्ण नाव माहीत नाही ) रा.मळशी,वाणेवाडी,ता. बारामती या सर्व जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात बैलगाडा शर्यतीला बंदी असतानाही,तसेच करोना प्रतिबंधक निर्बंधही लागू असताना बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील वाघळवाडी येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे भल्या सकाळीच ही शर्यत पार पडली.मात्र,ही शर्यत आयोजकांना चांगलीच भोवली असून या प्रकरणी एकूण १० ते १५ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सोमेश्वरनगर येथील वाघळवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे मैदान तयार करून,मा.सर्वोच्च न्यायालयाचे बैलगाडा शर्यत आयोजनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करून विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून कोणतेही मास्क न वापरता तसेच कोणतेही सुरक्षित अंतर न राखता कोविड १९ नियमांचे पालन न करता, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्यासारखे कृत्य केले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस अधिक तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *