Breaking News : बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीत कोरोनाच्या नियमांची पायमल्ली…तालुका पोलीस प्रशासन काय कारवाई करणार ?


झारगडवाडी : महाराष्ट्र टुडे लाइव्ह न्यूज नेटवर्क..

बारामती तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.. तालुक्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ४५ रुग्ण आढळले असून यामध्ये शहरात ३० तर तालुक्यात ग्रामीण मध्ये १५ रुग्ण आढळून आले आहेत.असे असताना बारामती तालुक्यातील झारगडवाडीतील सरपंच निवडीत नवनिर्वाचित सरपंच आणि पॅनल प्रमुखांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.आज झालेल्या निवडीनंतर महिला सरपंच,सदस्य आणि पदाधिकारी यांना कोरोनाचा विसर पडलाय की काय ? यामुळे अशा सरपंच सदस्यांकडून गावातील नागरिकांनी काय संदेश घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये नवनिर्वाचित सरपंचाचे फटाक्यांच्या,ढोलताशाच्या व गुलालाच्या आतषबाजीत सरपंचाचा जल्लोष करण्यात आला. यामध्ये देखील सामाजिक अंतर पाळलेले दिसून आले नाही.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत यांच्याकडून कोणतेही सामाजिक अंतर पाळलेले व कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी मास्क घातलेले दिसून येत नाही.यावेळी नवनिर्वाचित सरपंच वैशाली मासाळ,उपसरपंच सोनाली चव्हाण,पूनम आवटे,अनिता जाधव,पदमनाथ निकम, कल्पना झारगड,नारायण कोळेकर, दयाराम कोळेकर,दयाराम महाडिक पोपट निकम,राजेंद्र बोरकर,सुखदेव निकम,आप्पासो साळुंखे, रमेश बोरकर,सतीश कुलाळ,नितीन मासाळ,नितीन शेडगे, हनुमंत झारगड,राजेंद्र झारगड,राहुल चव्हाण,संतोष मासाळ, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आता कोरोनाची पायमल्ली करणाऱ्या महिला सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांच्यावर बारामती तालुका पोलिस काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

फोटो ओळी : झारगडवाडी ( बारामती ) येथील सरपंच निवडीत सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांच्या कडून कोरोनाची पायमल्ली..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *