Crime News : वडिलांचा खुन केल्याप्रकरणी मुलास जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा..!!


महाराष्ट्र टुडे लाइव्ह न्यूज नेटवर्क…

फलटण तालुक्यातील साठे फाटा येथे वडिलांच्या डोक्यावर, तोंडावर फरशीच्या तुकड्याने हल्ला करत खून करणाऱ्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नारायण भिकू इंगळे, वय.७० वर्ष,असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.

या खटल्याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार,मुलगा शामसुंदर नारायण इंगळे,वय.४६ (रा.साठेफाटा ता.फलटण,जि. सातारा ) याने ३० मार्च २०१८ रोजी रात्री साडे नऊ वाजता वडील नारायण भिकु इंगळे यांना स्टोव्ह मागीतला असता.त्यांनी देण्यास नकार दिल्याने आरोपीने चिडुन जाऊन वडिलांना शिवीगाळ दमदाटी करुन “आता तुला जिंवत ठेवत नाही” असे म्हणत शहाबादी फरशीच्या तुकडयाने हल्ला चवढवत डोक्यात व कपाळावर जबर मारहाण झाल्याने गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शामसुंदर याच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता.दरम्यान जखमी नारायण यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या गुन्ह्याचा तपास फलटण ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आर.आर.भोळ यांनी करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.याची सूनवणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्यासमोर सुरू होती.सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने ऍड.मिलिंद ओक यांनी युक्तिवाद करत सहा साक्षीदार तपासले.सरकार पक्षाचा युक्तिवाद व सुनावणी दरम्यान आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी शामसुंदर इंगळे याला जन्मठेपव पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद,अशी शिक्षा सुनावली.

या गुन्ह्याच्या तपासाकामी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे,पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण धन्यकुमार गोडसे,फलटण ग्रामीण कर्मचारी मुस्ताक शेख यांनी योग्य ती मदत केली.त्यांना पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव व पोलिस अंमलदार उर्मिला घारगे, शमशुद्दीन शेख,सुधीर खुडे, गजानन फरांदे,रिहाना शेख, राजेंद्र कुंभार,अश्विनी घोरपडे,अमित भरते यांनी योग्य ती मदत केली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *