या प्रकरणात २० ते २५ मंदिरामधील चोरीचे गुन्हे उघडकीस..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुका पोलीस ठाणे हृददीतील शिर्सुफळ गावात असलेल्या शिरसाई मंदिरातील देविच्या अंगावरील दागिणे व मंदिरातील इतर वस्तु चोरीस गेल्याची घटना घडली होती,त्या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस ठाण्यात येथे भा.द.वि कलम ३८०,४५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी शाहरुख राजू पठाण,वय.२४ वर्ष ( रा. गोपाळ,शिरगाव नॅशनल हायवे,४ जवळ,जि.कोल्हापूर ) मुळ गाव तक्रारवाडी,नीरा,ता.पुरंदर,जि. पुणे),पूजा जयदेव मदनाळ वय.१९ वर्ष,रा.गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ,जि. कोल्हापूर ) मूळगाव जुना बिडी कुंभारी,सोलापूर ) अनिता गोविंद गजाकोश,वय.१९ वर्ष,रा.गोपाळ शिरगाव नॅशनल हायवे ४ जवळ, जि.सोलापूर ) मूळगाव गोल घुमट शिवाजी चौक, विजापूर, कर्नाटक ) यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आरोपींना न्यायालयात हजर केले असता,त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिर्सुफळ येथील शिरसाई मंदिरात चोरीचा प्रकार घडला असता,हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे होते,या अनुषंगाने तपास करत असताना बारामती आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची पाहणी केली असता,रात्रीची वेळ असल्याने आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा नंबर समजण्यास अडचणी येत होत्या, परंतू पोलीस पथकाने वेगवेगळ्या कुलप्त्या वापरत वापरलेल्या इको वाहन क्र.एम.एच १४ एफ एक्स ४५७६ चा नंबर मिळाला. हे वाहन पिंपरी येथून चोरीस गेले असून त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तपासा दरम्यान आरोपी हे गोकुळ शिरगाव येथे असल्याची माहिती मिळाली.त्याप्रमाणे पथकाने सापळा रचत आरोपीतांना ताब्यात घेतले.यातील आरोपी शाहरुख पठाण आणि पूजा मदनाळ हे पती-पत्नी असून आरोपी अनिता ही आरोपीची मेव्हणी आहे.यासंदर्भातील माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आरोपींना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली देत,शिरसाई माता मंदिरात चोरीसह नागपूर,वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील वेगवेगळया जवळपास २० ते २४ मंदिरातील दागिणे व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली.आरोपींना या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी शाहरूख पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भोसरी,समर्थ नगर,फरसान खाना पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी आतापर्यंत शिरसाई माता मंदिरात चोरीस सर्व दागिणे व पितळी वस्तू सह महाराष्ट्रातील इतर मंदिरातून चोरी केलेले दागिणे,वस्तू तसेच पिंपरी येथून चोरी केलेली इको वाहन क. एम. एवं १४ एफ एक्स ४५७६ सह जवळपास १२ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हवालदार रमेश भोसले,पोलीस अमलदार नंदु जाधव,राहुल पांढरे विजय वाघमोडे,विनोद लोखंडे, रणजीत मुळीक,अमोल नरुटे, मंगेश कांबळे,चालक बापू गावडे यांनी केलेली आहे.