Big Breaking : शहर पोलीसांच्या शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी,गावठी पिस्टल व जीवंत काडतुसासह आरोपीला घेतले ताब्यात..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

धुळे शहरात नववर्ष व आगामी सण उत्सव लोकांना निर्भयपणे साजरेकरता यावे यासाठी पोलीस अधीक्षकांनी आदेश केले असता,त्या अनुषंगाने वेळोवेळी रात्रगस्त व कोबिंग ऑपरेशन राबवत असताना आरोपी आदित खिमशंकर भट्ट,वय.२२ ( रा.मनमाड जिन पाण्याच्या टाकी ) समोर गावठी बनावटीचा पिस्टल व जिवंत काडतुस बाळगून असल्याची माहिती मिळाली असता,त्याला ताब्यात घेत त्याच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धुळे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,धुळे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार,गस्त करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी आदित भट्ट हा इसम त्याच्या ताब्यात दहशत करण्याच्या हेतूने व गुन्हा करण्याच्या हेतूने गावटी बनावटीचा पिस्टल व जिंवत काडतुस बाळगत असल्याची माहिती मिळाली होती.याबाबत खात्री
करुन शोध पथकाचे अंमलदार यांनी शहरातील ज्योती टॉकीजच्या बाजुला असलेले विजय व्यायाम शाळेच्या समोर रोडवर आरोपीला घेराव करुन ताब्यात घेत,त्याची झडती घेतली असता,त्याच्या कमरेला डाव्या बाजुस एक पिस्टल व पॅन्टच्या उजव्या खिशात दोन जिवंत काडतुस असे सव्वीस हजार किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.

ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,शोध पथकाचे पोलीस अंमलदार विलास भामरे,मुक्तार मन्सुरी,पोलीस कर्मचारी निलेश पोतदार,अविनाश कराड, तुषार मोरे,शाकीर शेख,प्रसाद वाघ यांनी केलेली आहे.या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस हवालदार व्हि.आर.भामरे करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *