Crime News : वडगाव निंबाळकर पोलिसांना कऱ्हा नदीवरील बर्गे चोरणारी टोळी सापडते ? मात्र वाळू चोरीतील एक आरोपी सापडत नाही हे दुर्दैव की अजून काय ? अशी आंबी परिसरातील नागरिकांत चर्चा सुरू ?


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबुर्डी लोणीभापकर परिसरातील कऱ्हा नदीच्या बंधाऱ्यावरील बर्गे चोरणाऱ्या टोळीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली असून,आरोपी रूपेश मोहन इनामके,वय.२१,पांडुरग बंडाजी लडकत वय.३० ( दोघेही,रा. शेरेचीवाडी,बाबुर्डी,ता.बारामती, जि.पुणे)विवेक प्रकाश जराड, वय.२३( मुळ रा.उंडवडी, कडेपठार ता.बारामती,जि.पुणे ) सध्या रा.बुरूड गल्ली,बारामती अभिजित धोंडिबा तांबे,वय.२३ (रा.सुपे,ता.बारामती जि.पुणे ) रियाज दिलावर सय्यद वय २८ (रा.रिसे पिसे राजुरी,ता.पुरंदर, जि.पुणे,मोहन रघुनाथ इनामके,(रा.शेरेचीवाडी,बाबुर्डी,बारामती, जि.पुणे ) यांच्यासह एका विधीसंर्घष बालकाला वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,शिवराज मानिक चांदगुडे(रा.काऱ्हाटी,ता.बारामती जि.पुणे ) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.वडगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३७९,३८ प्रमाणे गुन्हा झालेला होता.या गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करत असताना,सी.सी.टी व्ही कॅमेरांची पाहणी करताना,काही संशयित आरोपी निष्पन्न झाल्याने रूपेश इनामके याला कोल्हापुर येथुन ताब्यात घेत त्यांचेकडे चौकशी केली असता,
आपल्या साथीदारांसह बारामती येथील व जळगाव येथील कऱ्हा नदीच्या पात्रातील बंधाऱ्याचे बर्गे चोरी केल्याचे कबुल केल्याने या आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना एवढी मोठी टोळी सापडू शकते तर आंबी बुद्रुक वाळू चोरी प्रकणातील आरोपी सापडू शकत नाही हे त्यांचे दुर्दैव म्हणावे की ? अजून काय ? अशी चर्चा आंबी परिसरातील नागरिकांत सुरू आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या
मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,पोलीस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार,पोलीस नाईक बापू
पानसरे,हिरामण खोमणे,पोलीस शिपाई पोपट नाळे,अमोल भुजबळ,किसन ताडगे,सचिन दरेकर,शेंडकर यांनी केलेली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस नाईक बापु पानसरे हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *