बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी व मेखळी हद्दीत मागील काही महिन्यांपासून कऱ्हा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा होत असताना महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने,महसूल प्रशासनाच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.असे असताना गुणवडी गावात कार्यरत असलेल्या तलाठी गजानन पारवे यांच्याकडे अतिरिक्त गावांचा चार्जे असल्याने त्यांना कारवाई करण्यास विलंब लागला जातो. मात्र मंडल अधिकारी सय्यद यांना सांगून देखील त्यांच्याकडून देखील कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते,यामुळे आता मंडल अधिकारी सय्यद कारवाई करण्यास का टाळाटाळ करतात ? त्यांचे या वाळू तस्करांबरोबर आर्थिक हितसंबंध देखील असल्याच्या जोरदार चर्चा डोर्लेवाडी ग्रामस्थांमध्ये सुरू असून,यामुळेच की काय मंडल अधिकारी सय्यद कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत अशी चर्चा देखील सुरू आहे.
तर दुसरीकडे डोर्लेवाडी परिसरात दिवसा ढवळ्या वाळू तस्करी सुरू असल्याचे दिसुन आले.या वर्षी कऱ्हा नदीला मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्यामुळे नदीपात्रात वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे. मागील अनेक वर्षापासून या परिसरातील कऱ्हा नदी पात्रातील वाळूचा लिलाव न झाल्याने वाळूची किरकोळ चोरी होत होती,मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदीपात्रात चार ते पाच फुटांचा वाळूचा थर निर्माण झालेला आहे.त्यामुळे अधूनमधून उपसा सुरूच होता.मात्र मागील आठ दिवसांपासून वाळूमाफियांनी रात्रीच्या वेळी खुले आम मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केलेला आहे.
डोर्लेवाडी परिसरातील गट नंबर. १३३ अवैधरित्या वाळू साठा आढळून आला असता,तलाठी पारवे हे रजेवर असल्याने ही बाब मंडल अधिकारी सय्यद यांच्या निदर्शनास आणली असता,त्यांनी डोर्लेवाडीचे कोतवाल माऊली मदने यांना त्या जागेची पाहणी करण्यास सांगितले असता, कोतवाल यानो पाहणी केली असता,डोर्लेवाडी गट नं. १३३ बबन जाधव यांच्या गटात अवैधरित्या अंदाजे १२ ते १५ ब्रास वाळू साठा आढळून आला.असे असताना तलाठी रजेवर असल्याचे सांगत सोमवारी पंचनामा करण्याचे सांगितले.मात्र अशा परिस्थितीत वाळू साठा चोरीस गेला तर बारामती तहसीलदार विजय पाटील मंडल अधिकारी सय्यद यांना जबाबदार धरणार का ? वाळू तस्करांबरोबरच्या आर्थिक हितसंबधापोटी मंडल अधिकारी सय्यद यांनी पंचनाम्यासाठी टाळाटाळ केल्याची चर्चा देखील सुरू आहे.
उपविभागीय अधिकारी उपविभाग बारामती यांनी वाळू तस्करांवर संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले असताना,संबंधित वाळू तस्करांना पोसायचे काम हे अधिकारी करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता पुणे जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश देणार का ? याचबरोबर वाळू तस्करांना सहकार्य करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का ? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.