बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यात विकास कामांचा धडाका मोठ्या प्रमाणात सुरू आहे,असे असताना विकास कामांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा देखील बारामती करांमध्ये सुरू आहे,मात्र यामध्ये कोणीही बोलण्यास धजावत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती मधील विकासकामांच्या आड जर कोण येत असेल तर कोणताही विचार करू नका,बाकीचे मी बघतो असे म्हटंल्यावर या विकास कामांमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराविषयी नक्की बोलणार तरी कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बारामती तालुक्यात हुकूमशाही सुरू आहे काय ? असा प्रश्न देखील सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अशाच एका विकासकामांध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे पत्रकार अभिजित कांबळे यांना निदर्शनास आली असता,त्यांनी ही बाब उपमुख्यमंत्र्याना सांगितली असता,या मंत्री महोदयांनी चक्क पत्रकाराला अरेरावीची भाषा वजा धमकीच दिली असल्याचा आरोप भारतीय नायकचे उपसंपादक अभिजित कांबळे यांनी केला आहे.बारामती शहरातील कऱ्हा नदी पात्रातील बेकायदा मातीमिश्रित वाळू प्रकरणी अभिजीत कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला असता,ऐका आपल्या जन्माच्या अगोदर पासून मी बारामती मतदार संघाचा आमदार आहे.या प्रकरणात लक्ष घालू नका अन्यथा आपण अडचणीत याल अशी धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धमकी दिली.
तसेच शासकीय मुलींचे वस्तीगृहा शेजारील व नक्षत्र गार्डन पाठीमागील रस्त्याची रुंदी करण्याचे काम चालू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार व पत्रकार अभिजित कांबळे यांच्यात सामना झाला असता,बारामतीतील विकास कामात होत असलेल्या गैर कारभारावर अभिजीत कांबळे यांनी प्रश्न विचारले असता उपमुख्यमंत्री यांचा तोल सूटला व त्यांनी या प्रकरणात लक्ष घालू नका अन्यथा आपण अडचणीत याल,अशी धमकी पत्रकार अभिजित कांबळे यांना दिली.