Big Breaking : अखेर जिल्ह्यातील शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांना पुन्हा टाळे,ऑनलाईन शिक्षण मात्र चालू राहणार..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय,खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणायांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि ३० जानेवारी २०२२ पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.ते विधान भवन पुणे येथे आयोजित जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत बोलत होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की,ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.कोविड संसर्गाची स्थिती बिकट होत आहे.

१०५ देश, भारतातील २३ राज्ये आणि राज्यातील ११ ठिकाणी ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर १८ टक्के आला आहे.या पार्श्वभूमीवर ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील,मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील.१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू ठेवावेत,अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.या बैठकीनंतर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी तात्काळ उद्यापासून दि.( ५ ) इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा दि.३०जानेवारी पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येतील तसेच ऑनलाईन शिक्षण सुरू राहील असा आदेश काढला आहे.

त्यामुळे ओमोक्रोनच्या वाढत्या संक्रमणाने अखेर जिल्ह्यातील शाळांना टाळे लावावे लागणार आहे.यावेळी या बैठकीस राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,आरोग्य मंत्री राजेश टोपे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट,वंदना चव्हाण,विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *