मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यातच राज्यातील आमदार,मंत्री आणि नेते मंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे.आता राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.फेसबुक पेजवरुन पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली.त्यानी लिहलेल्या पोस्टमध्ये गेली दोन वर्षे कोरोनाशी लढत असताना त्याला हुलकावणी देत होतो,पण अखेर त्याने मला गाठलंच.माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही.मात्र माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत..!!