बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अंतकरणापासून इच्छा असावी लागते असे प्रतिपादन बारामती उपविभागाचे पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.बारामती येथील देवगिरी करिअर अकॅडमी च्या वतीने पोलीस दलात समाविष्ट झालेल्या १५ यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रतिपादन केले.अकॅडमीचे संचालक एम.व्ही.चोपडे सर,पोद्दार जंबो किडचे संचालक तुकाराम पवार, पत्रकार सुनील शिंदे,लक्ष्मण भिसे,आदी यावेळी उपस्थित होते. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो,परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यासाचे नियोजन करायला हवे,प्रत्येक दिवस, प्रत्येक तासाचे नियोजन करून मेहनत घेऊन अभ्यास केला आणि स्वतःविषय आत्मविश्वास बाळगला तर यश नक्की मिळते,असेही इंगळे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी डीवायएसपी होण्यापर्यंतचा खडतर प्रवास सांगताना आपली सुरुवात जिल्हा परिषद शिक्षण सेवक या पदापासून होताना पुढे नायब तहसीलदार व नंतर डीवायएसपी म्हणून सिंधुदुर्ग,चंद्रपूर-गडचिरोली,रत्नागिरी आदी ठिकाणी सेवा केल्याचा उल्लेख केला.अत्यंत कमी स्वरूपाच्या मानधनात काम करत असताना विद्यार्थ्यांना व स्वतःला अनंत अडचणी येत असतात परंतु न डगमगता अडचणींना सामोरे जाता जाता ध्येया प्रति श्रद्धा व विश्वास बाळगून विद्यार्थ्यांनी यश खेचून आणावे.पहिल्यांदा एखादी कुठलीही पोस्ट हातात आले असता आपला आत्मविश्वास दुणावतो आणि त्या आधारे पुढील मोठी पोस्ट मिळवणे सोपे होते असेही त्यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अकॅडमीचे संचालक चोपडे सर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व मान्यवरांचे स्वागत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.अकॅडमीच्या माध्यमातून विविध राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल व विद्यार्थ्यांना देत असलेल्या सुविधांचा उल्लेख अकॅडमीचे संचालक चोपडे सर यांनी केला.या कार्यक्रमाचे आभार तुकाराम पवार यांनी केले सदर कार्यक्रमा करता ऍड.संतोष चोपडे,गणेश करे सर,सुहास काशीद सर, गोपाळ वाघमारे सर,ओमकार पवार सर विशेष परिश्रम घेतले.