पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
जिल्हा आस्थापना विभागाचे प्रमुख हे पोलीस अधीक्षक असतात,यामध्ये कोणत्याही अंमलदाराच्या अथवा अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात त्यांचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक असतात.आणि याच अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी एक ऑर्डर पारित केलेली आहे.यामध्ये कामशेत येथील पोलीस नाईक यांचे गावच्या महिला पोलीस पाटील यांच्याशी अनैतिक संबंध आहेत.या कारणामुळे त्यांची बदली करण्यात येत आहे. पोलीस अमंलदाराच्या बदली ऑर्डर मध्ये पोलीस पाटील महिलेशी अनैतिक संबंध असा आदेश पारित करून,पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असी ऑर्डर काढून त्या पीडित पोलीस पाटील महिलेच्या अब्रूचे धिंडवडे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी उडवले असल्याचा गंभीर आरोप भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी पोलीस अधीक्षक देशमुख यांच्यावर केला आहे.
ज्यांना कायद्याचा ज्ञान आहे,जे या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बघतात,जे महिलांची काळजी,तसेच त्यांची संपूर्ण जबाबदारी ज्या व्यक्तिमत्वावर आहे,त्या व्यक्तीने लेखी ऑर्डर मध्ये त्या महिलेचा विनयभंग केला असल्याचा आरोप देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यावर केला आहे.त्या महिलेने त्या गावात जगायचं कस,एका गावात एकच पोलीस पाटील असतो आणि तुम्ही डायरेक्ट ऑर्डरमध्ये लिहता,म्हणून या पोलीस अधीक्षकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.आणि याला सस्पेंड केला पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत गृहमंत्र्यांकडे केली आहे.जर या सरकारने त्यांना पाठीशी घातलं,तर आम्ही आमच्या पक्षाच्या महिला घेऊन राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल करणार आहोत. अशा पध्दतीची मागणी गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात केली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महिलेवरील झालेल्या अन्यायाची अनेक प्रकरणे,आपल्या पदाचा गैरवापर करून दाबून ठेवत, अधिकाऱ्यांची पाठराखण करत असून,त्यांच्यावर पोलीस पाटील महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा व बारामती मधील पोलीस निरीक्षकाला बलात्कारा सारख्या गुन्ह्यात अभय दिल्यामुळे त्यांना सह आरोपी करण्याची मागणी देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांनी या पोलीस अधीक्षकांना महिलांवर अत्याचार करण्यासाठी आणलंय का ? असा प्रश्न आता महिला वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मधील घडलेल्या पोलीस निरीक्षकांच्या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश देणार का ? तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे हे पोलीस पाटील महिलेच्या विनयभंगा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांवर कारवाई करणार का ? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.तसेच महिला पोलीस पाटलांच्या प्रकरणामुळे महिलांवर्गाकडून देखील पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्याचा सुर धरू लागला आहे.