फडणवीस सरकारच्या काळात माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही,गृहराज्यमंत्र्यांनी दिलेली माहिती खोटी ; पडळकरांनी वाचली स्टेशन डायरी..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सांगली येथे जमावाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असता, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी सभागृहात म्हणटले की, फडणवीस सरकारच्या काळात गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हे दाखल होते,मात्र हा सर्व प्रकार खोटा असून,या प्रकरणात मला अडवण्याचा प्रयत्न केला तरी,देखील मी लढा सुरूच ठेवणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.तसेच गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहात दिलेली माहिती
ही खोट्या स्वरूपाची आहे.पोलीस स्टेशन मधील डायरीत मी हल्ला केला असा कुठेही उल्लेख नसताना,उलट कसा आहे तरी लोकांचा जमाव जमला होता माझ्या गाडीवर हल्ला झाला असा उल्लेख आहे.

असे असताना,गृहराज्यमंत्री यांनी सभागृहाची दिशाभूल केलेली आहे.मी कुठेही खाली उतरलो नाही मी गाडी अंगावर घालास, असं म्हटलं नाही.याच लोकांनी खोटे साक्षीदार उभे केलेत. माझ्या वरील गुन्ह्याचा पाढा वाचला, त्यामुळे मी गुन्हेगार आहे पण सर्व गुन्हे सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेत,असं भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.जनतेसाठी लढा देतोय म्हणून तीन पक्षातील प्रस्तापित मला कुठे तरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.जमिनी बळकावल्याचा गुन्हा माझ्यावर कोणता नाही सर्व गुन्हे आताचेच आहेत. गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलं की फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा माझ्यावर गुन्हे होते हे सर्व खोटं आहे.मला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मी लढा सुरूच ठेवणार,असल्याचं पडळखर म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *