कारवाईत तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची कामगिरी गेल्या वर्षभरापासून धडाकेबाज होत आहे,मागील एका वर्षामध्ये गुन्हे शोध पथकाने वेगवेगळ्या कारवाईत तब्बल १८ पिस्टल हस्तगत केले आहे.आतापर्यंतच्या पुणे ग्रामीणची इतिहासातील सर्वांत मोठी कामगीरी मानली जात आहे. अशातच मी जिल्ह्यात वाढत्या सशस्त्र दरोड्याचे प्रमाण व गोळीबार प्रकरण यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार कारवाई करत असताना आरोपी धर्मराज पोपट वाघमारे,वय.३३ वर्ष ( रा.शेळगाव ता.इंदापूर,जि.पुणे ) याला ताब्यात घेत त्याच्याकडील दोन पिस्टल व ३ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून,त्याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम ५ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पुणे जिल्हयात वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता,यामध्ये अनेक ठिकाणी गोळीबार प्रकरण, सशस्त्र बँक दरोड्याचे प्रमाण वाढले असल्याने,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार,कोम्बीग ऑपरेशन राबवत असताना,गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की,बारामती जळोची रोडवर असणाऱ्या मोनिका लॉन्स समोर आरोपी धर्मराज वाघमारे हा पिस्टल विक्रीसाठी थांबला असून,गुन्हे शोध पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जात, त्याला ताब्यात घेत,झडती केली असता,त्याच्या दोन पिस्टलसह तीन जिवंत काडतुसे मिळून आली.त्याच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी क्र.एमएच ४२ एएक्स ७०६० ही गाडी ताब्यात घेतली असून,या प्रकणात चार लाखांच्या गाडीसह ५० हजारांचा काडतुसासह तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या गुन्हयाचा अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते हे करीत आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते,उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे,नंदु जाधव,विजय वाघमोडे, विनोद लोखंडे,पोलीस नाईक सदाशीव बंडगर,रणजित मुळीक यांनी केली आहे.