Big Breaking : रक्षकच जर भक्षक बनत असतील तर, त्याचं संरक्षण कशाला घ्यायचं आमदार गोपीचंद पडळकरांचा सांगलीचे पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्यावर गंभीर आरोप..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या फेसबुक पेज वरून ७ नोव्हेंबर २०२१ या दिवशी त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडीओ टाकला असून,तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून,माझ्या हत्येच्या कटात पवार कुटुंबीय, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील सांगलीचे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक हे देखील माझ्या हत्येच्या कटात सामील होते असल्याचा गंभीर आरोप गोपीचंद पडळकरांनी केला आहे.व्हायरल झालेला व्हिडीओ हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस स्टेशनच्या समोरील असून तिथं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

हा हल्ला पूर्वनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं तब्बल २०० ते ३०० लोकांचा जमाव लाठ्या काठ्यासह माझ्या गाडीवर हल्ल्या करण्यासाठी तयार होता.पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा पूर्वनियोजित कट आखला होता,असं गोपीचंद पडळकर म्हणाले.या हल्ल्याबाबत पडळकर म्हणाले की,या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना दिसून येत आहे. हा सगळा कट पोलीस सरंक्षणात घडवून आणला जात आहे.ही घटना थांबवण्याऐवजी पोलीस चित्रीकरणात मग्न होते,असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यात सांगली जिल्हा पोलीस
अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना पूर्णपणे जबाबदार धरले आहे.कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि माझ्यावर ३०७ सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला,असं गोपीचंद पडळकर म्हणाले.पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यानं बॉडीगार्ड न वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.रक्षकचं जर भक्षकात सामील झाले असतील तर विश्वास कोनावरती ठेवायचा असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.यामुळे आता मी महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवणार असल्याचं देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *