Big Breaking : आंबी खुर्द मधील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणातील आरोपीला बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन केला नामंजूर..!! वडगाव पोलीस आता तरी आरोपीला ताब्यात घेणार का ?


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

बारामती तालुक्यातील आंबी खुर्द मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असताना,सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार गाव कामावर तलाठी जगदाळे यांनी गौण खनिज उत्खनन करणाऱ्या आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासत पंचनामा केल्याची जोरदार चर्चा सुरू असून,या प्रकरणात गट न.२५ लगत मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले असून, तलाठी महोदयांनी केवळ ५७ ब्रासचे उत्खनन दाखवत जागेवर ३० ब्रासचा मुद्देमाल मिळून आला असल्याचा पंचनामा १६ डिसेंबर रोजी केला असून, गुन्हा देखील त्याच दिवशी दाखल करणे अपेक्षित असताना,केवळ आर्थिक हितसंबंध जोपासत दोन ते तीन दिवसांच्या फरकाने आरोपी स्वप्नील भाऊसाहेब मोडक ( रा.उरुळी देवाची,ता. पुरंदर,जि.पुणे ) यांच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडगाव पोलिसांची सध्याची कामगिरी पाहता त्यांना वाळू चोरीतील आरोपी सापडत नाही हे वडगाव पोलिसांचे दुर्दैव म्हणावे की ? अजून काय ?

आरोपीने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धडपड केली होती,मात्र मुळ तक्रारदारांनी या प्रकरणातील पंचनामा केल्यापासून ते गुन्हा दाखल करेपर्यंतची तफावत मा. कोर्टाला सांगितली असता, बारामती जिल्हा सत्र न्यायालयातील मा.दि.भा.बांगडी कोर्टाने सदर आरोपीचा जामीन नामंजूर केला.या ठिकाणच्या पंचनाम्यामध्ये फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून येत असल्याचे दिसून येत आहे.कारण फिर्यादी यानी फिर्याद देताना केवळ ७ ब्रास गौण खनिज चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे.मात्र सदर मूळ तक्रारदार यांनी या ठिकाणी पाहणी केली असता,या ठिकाणी अंदाजे १०० ते १५० ब्रास वाळू साठा दिसून येत असताना,तलाठी महोदयांनी केवळ ३० ब्रास चा साठा मिळून आला असा पंचनामा नक्की कोणत्या आधारे केला ? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना सदर प्रकरणात फेरपंचनामा करण्यासाठी पत्रव्यवहार केला असता, अद्यापही या प्रकरणी तहसीलदारांनी फेरपंचनाम्याचे आदेश दिलेली नाहीत,यामुळे आता या प्रकरणात तहसीलदार विजय पाटील यांच्यावर देखील संशयाची सुई निर्माण होत असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.यामुळे आता तरी या प्रकरणात तहसीलदार विजय पाटील फेरपंचनाम्याचा आदेश देणार का ? केवळ कारवाईचा फार्स दाखवत वाळू तस्करांना पाठीशी घालण्याचे काम तहसीलदार यांच्याकडून होत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.या प्रकरणात मूळ तक्रारदार म्हणून सामाजिक कार्यकर्ते भास्कर दामोदरे व महाराष्ट्र टुडे लाईव्ह संपादक विकास कोकरे हे असल्याने विकास कोकरे यांनी मा.बांगडी कोर्टासमोर आपले म्हणणे सादर केले असता, आरोपीचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता हे प्रकरण सामाजिक कार्यकर्ते भास्कर दामोदरे विभागीय आयुक्तांपुढे पुराव्यानिशी सादर करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *