बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीमध्ये गोरगरिबांसाठी शासनाकडून मिळालेल्या रेशन धान्यांची वारंवार काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री होत असल्याचे गुन्हे दाखल असून वारंवार रेशन मालाची काळ्या बाजारात विक्री कशी काय होते ? जर योग्य वेळी रेशन दुकानदारांचे परवाने पुरवठा विभागाने निलंबित,केले तर अशा प्रकारांना आळा देखील बसू शकतो,मात्र पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकावयास मिळत आहे.यामुळे आता गुन्हा दाखल झालेल्या रेशन दुकानदारांचे परवाने पुरवठा विभाग निलंबित करणार का ? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गरजूंना आलेला रेशनिंगचा तांदूळ संगनमताने खुल्या बाजारात विकणाऱ्या निलेश मोहन मोरे ( रा.आमराई, ता.बारामती,जि.पुणे ) मोहन पोपट गाडे,सध्या रा.शारदानगर केव्हीके ग्राउंड शेजारी ) मुळ रा. निरावागज,ता.बारामती,जि.पुणे ) या दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुरवठा अधिकारी स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्या ताब्यातील गाडीसह २८५० किलो तांदूळ असा बेचाळीस हजार ७५० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानात गरजूंना वितरित होणारा तांदूळ हा सदर संशयित आरोपींनी खरेदी करून तो खुल्या बाजारात चढया भावाने विक्रीकरित भरून विनापरवाना मालवाहतूक गाडी क्र. MH.42. M.9216 गाडीमध्ये रेशनिंगचे मालाची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करण्याचे उदेशाने घेवून जात असल्याची माहिती मिळाली असता,पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले असता,या वाहनात २८५० किलो तांदूळ आढळून आला,या वाहनाचा वाहन चालक मोहन गाडे यांच्याकडे विचारणा केली असता,या पिशव्यांमध्ये तांदूळ असून तो निलेश मोरे यांच्या दुकानातील असून,तो काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी मोरे यांनी सांगितले असल्याचे चालकाने कबूल केले.यामध्ये तांदूळाने भरलेली खाकी रंगाची सरकारी शिक्का असलेली पोती,तसेच मालवाहतूक करणारी गाडीसह मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी केली आहे.