इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात गुटका विक्रीवर व वाहतुकीवर बंदी असताना बेकायदेशीरपणे अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांना इंदापूर पोलिसांनी पकडले असून त्यांच्या ताब्यातील तब्बल २१ लाखांचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये आरएमडी व विमल कंपनीची ४० पोती व २५ बॉक्स असा एकूण २१ लाखांचा गुटखा व १५ लाखांचा टेम्पो असा तब्बल ३६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असुन चालक व वाहन मालकाविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३२८ कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बायपासवर नाकाबंदी करत असताना त्यांना एक टेंम्पो क्र.( एम.एच.४५,ए.ई.५३४८ ) संशयितरित्या जात असतानाचे आढळून आल्याने टेंम्पोची तपासणी केली असता,त्यामध्ये विक्रीसाठी चालवलेल्या गुटख्यांची पोती मिळून आली.गाडीसह आरोपीला ताब्यात घेतले आहे.या टेंम्पोमध्ये गुटख्याची एकूण २५ पोती व २५ बॉक्स असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक टी वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे,पोलीस नाईक मनोज गायकवाड,पोलीस कॉन्स्टेबल निलेश फडणीस यांनी केली आहे.