Big Breaking : आंबी खुर्द अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल,मात्र गाव कामगार तलाठी जगदाळेंची फिर्याद संशयास्पद..!!


आंबी खुर्दमधील मुद्देमाल अद्यापही हस्तगत नाही..लवकरच या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विभागीय चौकशीची मागणी करणार…!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

मागील काही दिवसापासून बारामती तालुक्यातील आंबी खुर्द येथील गट नंबर २५ मध्ये अवैध उत्खनन सुरू होते,असे असताना मात्र महसूल विभागाकडून जाणीवपूर्वक व अर्थपूर्ण तडजोडीमुळे कानाडोळा केला जात होता,मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पत्रकारांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी अर्जामुळे महसूल विभागाला नाईलाजास्तव कारवाई करावी लागली.या कारवाईमध्ये गाव कामगार तलाठी रमेश जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी स्वप्नील भाऊसाहेब मोडक ( रा.उरुळी देवाची,ता. हवेली,जि.पुणे ) यांच्यावर अवैध वाळू उत्खनन प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३८९,खान व खनिज ( विनिमय व विकास ) अधिनियम १९५७ चे कलम २१ (४),पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९,१५ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी या कारवाईमध्ये तलाठी रमेश जगदाळे यांनी दिलेली फिर्याद संशयास्पद वाटत असल्याची जोरदार चर्चा सुरू असून,आंबी खुर्दमधील कऱ्हा नदीपात्रालगत असणाऱ्या गट नं.२५ मधून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उत्खनन झाले असताना,तलाठी जगदाळे यांनी केवळ ५७ ब्रास उत्खननाचा पंचनामा करून केवळ ३० ब्रास स्टॉक मिळून आला असा पंचनामा केला असताना,तलाठी महोदयांनी कुणाच्या दबावाला बळी पडून अथवा आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासत केवळ नावापुरती कारवाई म्हणून अंदाजे ७ ब्रास वाळूची चोरी केल्याची फिर्याद दिली आहे,असे असताना या महोदयांनी केलेल्या पंचनाम्याचे नेमके काय झाले ? केवळ २८ हजारांचा मुद्देमाल आरोपींनी चोरी करून पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे कृत्य केले असल्याची फिर्याद दिली आहे.

मात्र या ठिकाणी अंदाजे १०० ते १२० ब्रासच्या पुढे वाळू साठा असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे,असे असताना तलाठी जगदाळे यांनी फिर्याद देताना नक्की कशा प्रकारे फिर्याद दिली याची व तलाठी जगदाळे व वाळू तस्करांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी काही सामाजिक कार्यकर्ते लावणार हे नक्की ? आंबी खुर्द मधील वाळू उपसा नक्की कोणत्या राजकारण्याच्या आशीर्वादाने चालतो ? की महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालतो ? असा प्रश्न आता आंबी खुर्दमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.नावापुरती कारवाई करून देखील,आंबी खुर्दमध्ये कऱ्हा नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणावर अद्यापही अवैध वाळू तस्करी सुरू असून पुणे जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी या प्रकरणात लक्ष घालून वाळू तस्करांना पाठीशी घालणाऱ्या गाव कामगार तलाठी व या प्रकरणात संशयाची भूमिका असलेल्या तहसीलदार विजय पाटील यांच्यावर कारवाई करणार का ? हे पाहणं देखील महत्त्वाच ठरणार आहे.

यामुळे आता बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी नुकतेच बारामतीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तालुक्यातील वाळू तस्करांवर संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत ( मोक्का ) कारवाई करण्याचे ठराव तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये दिले असून,आंबी खुर्द प्रकणातील वाळू उत्खनन प्रकरणातील आरोपींवर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे मोक्का अंतर्गत कारवाई करणार का ? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.तसेच या प्रकरणात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंबी खुर्दमधील गट नं.२५ मध्ये झालेल्या अवैध उत्खननाचा फेर पंचनामा होण्यासाठी व आरोपीवर जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) मधील तरतूदीनूसार दंडात्मक कारवाई करण्याचे व कलम ४८ ( ८) मधील तरतुदीनुसार वाळू उत्खननासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामुग्री व वाहतुकीसाठी वापरलेली वाहने जप्त करण्यासाठी व अवैधरित्या उत्खनन केलेली वाळू जप्त करण्यासाठी पत्रव्यवहार केला असताना देखील तहसीलदार विजय पाटील सामाजिक कार्यकर्त्यांना व पत्रकारांना बघू करूची भाषा वापरत आहेत. यामुळे पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तहसीलदार विजय पाटील व गाव कामगार तलाठी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) अधिनियम १९७९ नुसार कारवाई करणार का ? हे पाहणं आता औतूसक्याचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *