Crime News : यवत पोलिस ठाण्यातील जबरी चोरीतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद..!!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

रेकॉर्डवरील फरार आरोपी शोधून तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक बारामती तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील फरार आरोपींचा शोध घेत असताना, मिळालेल्या माहितीनुसार,यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भा.द.वि.कलम ३९२,३२३,५०४ ५०६,३४ मधील फरार आरोपी सौरभ सुनील लोणकर,वय.२०( रा.माळेगाव,ता. बारामती ) हा माळेगाव बुद्रुक रोडवर येणार असल्याची बातमी मिळाल्याने सापळा लावून,त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

त्याची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला गुह्याच्या तपासाकामी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे,पोलीस हवालदार रविराज कोकरे,पोलीस नाईक अभिजीत एकशिंगे,स्वप्निल अहिवळे सहाय्यक फौजदार काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *