Big Breaking : शासकीय नोकर भरतीचे बारामती तहसिल कार्यालयातील डोमासाईल रॅकेट उघड होण्याच्या मार्गावर..या प्रकरणात एका खाजगी एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा जोरदार सुरू..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तहसिल कार्यालयात पारदर्शक कारभार होताना दिसून येत नसल्याच्या चर्चा नागरिकांत सुरू असतानाच बारामती तहसिल कार्यालयामध्ये २०१९ च्या शासकीय नोकर भरतीसाठी लागणारे डोमसाईल हे बोगस प्रकारची डोमासाईल दिले गेले असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे,या प्रकरणात एका बारामती मधील तहसिल कार्यालयातील एजंटाला निगडी पोलिसांनी अटक केली केल्याच्या जोरदार चर्चा बारामती मध्ये सुरू आहेत.यामध्ये काही रेशनकार्ड ही बोगस स्वरूपाची बनवलेली मिळून आली असल्याची चर्चा आहे.

२०१९ शासकीय नोक भरतीसाठी लागणाऱ्या एका डोमासाईलसाठी प्रत्येकी पाच हजार रूपये घेतल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बारामती तहसिल कार्यालयातील एक खाजगी एजंटद्वारे हे काम करण्यात आले होते.या एजंटच्या आणि तहसिल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या फोन पे व गूगल पे द्वारे पैसे घेतल्याच्या चर्चेला देखील उधाण आले आहे.यामध्ये महसूल विभागातील काही मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.हे डोमसाईल बारामती एमआयडीसी मधील एका नांमकित अकॅडमी मधील विद्यार्थ्यांसाठी दिले गेले होते, परंतु ही गोष्ट उघडकीस आल्याने ही डोमसाईल रिजेक्ट केल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणातील सर्व कागदपत्रे व पुरावा तहसिल ऑफिस मधील काही ठराविक लोकांनी नष्ट केल्याचे देखील बोलले जात आहे.याप्रकरणाबाबत काही लोकांना माहिती असून,लवकरच हा प्रकार पोलिसांच्या कानावर घालणार असल्याची माहिती मिळाली असून,यामध्ये खाजगी एजंट तहसील कार्यालयातील मोठ्या अधिकाऱ्यांची नावे घेणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

या डोमसाईल प्रकरणात लाखो रुपयांची अफरातफर झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या खाजगी एजंटचा बळी तहसिल कार्यालयातील मोठ्या अधिकाऱ्यांनी दिला अशा चर्चेला देखील पेव फुटला आहे. त्यामुळे आता या डोमासाईल रॅकेट प्रकरणात कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे लवकर उघडकीस येणार का ? खाजगी एजंट कडून कोणाचे नाव समोर येणार ? या बोगस डोमसाईल प्रकरणी तहसिल कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या कामाच्या रचनेत बदल केले गेले असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.यामुळे आता या प्रकरणात कोण कोणते मासे गळाला लागणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *