शेटफळगडे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती भिगवण रोडवर असणाऱ्या शेटफळगढे गावचे हद्दीतील पांदी पाटी येथे बारामती कडून भिगवणकडे निघालेल्या एका भरधाव ट्रक चालकाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली, धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.संतोष मारुती शिंदे, वय.४७ वर्ष ( रा.सणसर,ता. इंदापूर,जि.पुणे ) असे अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. याबाबत फिर्यादी मारुती बजरंग गाडेकर,वय.३२,वर्ष ( रा.भिगवण स्टेशन,ता. इंदापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भा.द.वी कलम ३०४ (अ),२७९, ३३७,३३८,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबनात भिगवण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी रात्री साडे आठच्या दरम्यान बारामती भिगवण रोडवरून ट्रक नं.MH.42.B.8296 हा अज्ञात चालक हा बारामतीकडुन भिगवणकडे निघाला होता.शेटफळगढे गावच्या हद्दीतील पांदी पाटी येथे आल्यावर ट्रक चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने,त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या कडेला उभ्या असलेल्या सिक्युरीटी गार्डला धडक दिली.या अपघातात ट्रकचे पाठीमागील डाव्या बाजुचे चाक त्याच्या कंबरेवरुन गेले.यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यु झाला.या अपघातात त्याचे दोन्ही पाय फैक्चर झाले होते.याप्रकरणी अधिक तपास भिगवण पोलीस करीत आहेत.