मोठी बातमी : बारामती शहर पोलिसांची बेकायदा दारू विक्रीवर व जुगार चालकांवर संयुक्तपणे धडक कारवाई..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज..

बारामती तालुक्यात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे चालू देऊ नका याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी आदेश दिलेले आहेत.बारामती शहरातील कसबा परिसरातील साठेनगर या ठिकाणी येथे महिलेला हातभट्टीचे ४० लिटर रसायन विक्री करणाऱ्या अमोल गव्हाणे,वय.३० वर्ष(रा.माळेगाव,ता.बारामती,जि. पुणे )याला ताब्यात घेत त्याच्यावर भा.द.वी कलम ३२८,दारूबंदी कायदा ६५ ( ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच बारामती शहरातील पान गल्ली या ठिकाणी आरोपी अमित बाळकृष्ण गरड वय.२९,(रा.जामदार रोड,कसबा बारामती ) हा कल्याण मटक्याचा मयूर दीपक कांबळे याच्याद्वारे जुगाराची आथिर्क देवाणघेवाण करताना मिळून आल्याने त्याच्याकडील ३४० रुपये मटका हस्तगत करण्यात आला.

शहर पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,शहरात पेट्रोलिंग करत असताना,आरोपी अमोल गव्हाणे हा बुलेट मोटरसायकल क्र. MH.42 BD 589 वर गावठी हातभट्टीचे ४० लिटर रसायन साठे नगर कसबा या ठिकाणी मीनाताई गव्हाणे हिला विक्री करत असताना मिळून आल्याने शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत दारूबंदी कायद्याअनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पान गल्ली या ठिकाणी अमित गरड हा कल्याण मटक्याच्या पैशाची देवाणघेवाण करून नशिबावर मटका जुगार घेत असताना मिळून आल्याने,हा मटका मयूर दीपक कांबळे याच्या मार्फत फिरवत असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत,त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम ३४० रुपये रोख पिन मटका चिठ्ठी व साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे,पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर,तुषार चव्हाण मनोज पवार,बंडू कोठे,रामचंद्र शिंदे,अजित राऊत,दशरथ इंगोले यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *