बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती तालुक्यातील सांगवी येथील खंडोबानगर परिसरातून कत्तलीसाठी अवैधरित्या नेण्यात येणार्या २७ जनावरांची सुटका करण्यात आली.याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.यामध्ये साकीब जावेद कुरेशी,वय २० वर्ष,(रा.म्हाडा कॉलनी,बारामती, गुणवडी रोड ),समीर सैपन शेख, वय.२२ वर्ष वाहनचालक(रा.मेखळी,ता.बारामती,जि.पुणे) बिलाल राजा शेख,वय.२० वर्ष (रा.निरावागज,ता.बारामती,जि. पुणे),उस्मान गब्बर शेख,वय.२० वर्ष (रा.सरडे,ता.फलटण,जि. सातारा ),युसूफ सयनन शेख,वय.२४ ( रा.सरडे,ता.फलटण,जि. सातारा ) यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,(सी),(वी) प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ चे कलम ४७,४८, ४९,५४,५६ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१),(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,फिर्यादी ऋषिकेश प्रभाकर देवकाते,वय.२६ वर्ष,(रा.निरावागज,ता.बारामती जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो गोसेवक म्हणून कार्यरत असून,त्याला मिळालेल्या माहितीनुसार,बारामती तालुक्यातील सांगवीमधील खंडोबानगर परिसरात अज्ञात लोक संशयितरित्या जनावरे गोळा करून कत्तलीसाठी वाहणांमध्ये भरून घेऊन जात असल्याचे समजले असता,फिर्यादी त्याचे साथीदारांसह सांगवी मधील चांदणी चौकात येत,तालुका पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिली.पोलिसांनी येत घटनास्थळी असलेली गाडी क्र. MH.42 AQ 4692 या आयशर टेम्पोमध्ये पाहणी केली असता, त्यामध्ये १३ गायींचे चारही पाय व तोंडे बांधून दाटीवाटीने कोंबून भरलेले दिसून आले.शेजारी असणाऱ्या गोठ्यात ११ बैल व ५ गायी देखील कोंबून बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्या.या जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा व पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती सर्व जनावरे अशक्त व भुकेने व्याकुळ झालेली दिसून आली. पोलिसांनी एकूण २९ जनावरांची सुटका करून, आरोपींच्या ताब्यातील तब्बल ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.
या कारवाईत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व पोलीस कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच या करवाईत संभाजी देवकाते, युवराज डाळ,विशाल देवकाते, तुषार तावरे,रोहन बुरुंगले,महेश पवार,विक्रम माने,शरद गाडे, संकेत गोळे,राम भोसले,अक्षय क्षीरसागर व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्ष दलाचे यांचे देखील सहकार्य लाभले.मिळालेल्या २९ जनावरांना गोशाळेत पाठविण्याकरिता टेम्पो साठीचा भाडे खर्च मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी केला.