बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामतीमध्ये एवढे गुन्हे दाखल होऊनही सावकारकी कुठे थांबताना दिसून येत नाही,असे असताना बारामती शहरातील टी. सी.कॉलेज जवळील महिलेने, व्याजाच्या पैशासाठी बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देत,तिच्या साथीदार याच्यामार्फत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या डोर्लेवाडीतील एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.राजश्री रमेश मोरे (रा.टी.सी. कॉलेज जवळ,ता.बारामती,जि. पुणे),विशाल बाबूराव सूर्यवंशी (रा.डोर्लेवाडी,ता.बारामती,जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी किरण सातव (रा.माळेगाव कारखाना, शिवनगर,ता.बारामती,जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि कलम ३८४,३८५,५०४ ५०६,५०७ (३४), महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी किरण सातव हे बारामती शहरातील कसबा चौकात गुरुकृपा नावाचे हॉटेल चालवतात हॉटेल व्यवसायामध्ये त्यांना अचानकपणे पैशाची गरज लागल्याने,त्यांनी त्यांचा मित्र विशाल सूर्यवंशी याला,मला पैशाची गरज आहे असे सांगितले असे सांगितल्यावर सूर्यवंशी याने राजश्री मोरे ही महिला सावकारी व्यवसाय करते ती तुम्हाला पैसे देईल,यामुळे सूर्यवंशी यांनी राजश्री मोरे हिच्याशी ओळख करून दिली,त्यानंतर मोरे हिच्याकडून फेब्रुवारी २०२१ मध्ये पेटीएमद्वारे दहा दिवसांसाठी ५५ हजार व्याजाने घेतले होते हे पैसे वेळेवर न देता आल्याने मोरे यांना ६२ हजार रुपये द्यायचे ठरवले होते,परंतु ती रक्कम देखील देता न आल्याने प्रत्येक आठवड्याला सात हजार रुपये द्यायचे नाही दिले,तर मुद्दल रकमेमध्ये सात हजार रुपयाचे व्याज लावून ती रक्कम द्यायची या बोलीवर त्यांना प्रत्येक आठवड्याला सात हजार रुपये रक्कम देण्याचे ठरले होते.
याप्रमाणे मोरे हिला दर आठवड्याला व्याजाचे पैसे दिले जात होते,आरोपी मोरे हिने सातव यांच्याकडे तीन लाख देण्याची मागणी केली होती,व्याजाची परतफेड केल्यानंतरही ती सातव यांना वारंवार मला पैसे दिले नाही तर तुझ्यावर बलात्काराची खोटी केस दाखल करून तुला कुठेही तोंड दाखवायची जागा ठेवणार नाही,तसेच तुझ्या हॉटेलवर येऊन तुझे हॉटेल बंद करेल,तुझ्या घरी येऊन गोंधळ करेल असे म्हणत वारंवार शिवीगाळ व दमदाटी करत होती. तसेच मुलीचा साथीदार विशाल सूर्यवंशी याने बऱ्याच वेळा हॉटेलवर येऊन मला व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करून माझ्या हॉटेलवर गोंधळ देखील घातलेला आहे.दरम्यान या नंतर फिर्यादी किरण सातव यांनी त्रासाला कंटाळून अखेर कुटुंबाच्या मदतीने बारामती शहर पोलिसांत धाव घेतली आणि राजश्री मोरे व तिचा साथीदार विशाल सूर्यवंशी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.यानंतर शहर पोलिसांनी महिलेसह युवकांना ताब्यात घेतले आहे. याबाबत शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.