धक्कादायक बातमी ! घरकाम करण्यास उशीर झाला म्हणून, अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवून मारहाण करणाऱ्या मालकिणीवर गुन्हा दाखल…!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क :

घरकाम करण्यास उशीर झाल्याने मुंबई मधील घर मालकीणीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली असून,पीडित मुलीच्या चुलत बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार वर्सोवा पोलिसांनी या महिलेविरुद्ध भा.द.वी कलम ३२६,३५४ (ब), ५०४, ECF पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,आरोपी महिलेने राग आल्यानंतर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कपडे काढण्यास सांगितले त्यानंतर चप्पलने तिची मारहाण केली.
मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील महिलेने मुलीला घरी काम करण्यास ठेवले.पोलिस स्थानकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना ६ डिसेंबरला रात्री घडली. रात्री ११ च्या सुमारास मुलीला काम करण्यास उशीर झाला.

ज्यानंतर रागवलेल्या महिलेने मुलीला कपडे काढण्यास सांगितले. एवढचं नाही तर महिलेने मुलीचा व्हिडीओ देखील काढला आणि त्यानंतर मुलीची चप्पलने मारहाण केली.या घटनेनंतर पीडित मुलीवर कूपर रुग्णालयात उपचार करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर मुलीला घरी सोडण्यात आले.या घटनेनंतर पीडित मुलीच्या बहिणीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या चुलत बहिणीच्या जबाबानंतर घर मालकीणी विरुद्ध गुन्हा दाखल केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *