बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालक पदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. ‘अ’ वर्ग सोसायटी प्रतिनिधी गटातून बारामतीतून अर्ज दाखल केलेल्या शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला.त्यामुळे पवार यांचा बँकेवर बिनविरोध जाण्याचा मार्ग मोकळा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता.शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनीही याच गटातून अर्ज दाखल केला होता.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूकीला सामोरे जावे लागणार की ते बिनविरोध होणार याकडे लक्ष लागले होते.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीची जबाबदारी सोपविलेल्या ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी बुधवारी सकाळी काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली.त्यानंतर एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जात काकडे यांनी अर्ज मागे घेतला.विशेष म्हणजे यंदा प्रथमच पवार यांना जिल्हा बँकेत बिनविरोध संधी मिळाली आहे. यासंबंधी काकडे म्हणाले, सामाजिक कारणांसाठी मी अर्ज दाखल केला होता.पवार यांच्याशी सोमेश्वर कारखान्याच्या विषयावर चर्चा झाली.त्यांनी काही प्रश्न मार्गी लावले बाकीचे मार्गी लावतो असे आश्वासन दिले. वास्तविक जिल्हा बँकेशी काकडे घराण्याची पूर्वीपासून जवळीक आहे.बँक स्थापनेमध्ये स्व.मुगुटराव काकडे यांचा सिंहाचा वाटा होता.सहकाराचा ही बँक कणा आहे.पवार जिल्हा बँकेशी काकडे घराण्याची पूर्वीपासून जवळीक आहे.त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जात उमेदवारी माघारी घेतली,या निवडीमुळे अजित पवार यांची पहिल्यांदाच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.